मंगळवार, २१ एप्रिल, २०१५

राजा शिवछत्रपती..

प्रोढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावंतास” ब्राम्हण सत्ताधारी, वॆश्य व्यापारी आणि यांची सेवा करण्यासाठी क्षुद्र असा संकोचित विचार रुजवीला गेला व देश हजारो वर्ष गुलामगिरीच्या अंधार कोठडीत नेऊन टाकला. अशा वेळी महाराष्ट्रच नव्हे तर संपुर्ण भारत गुलामगिरीच्या कोठडीतुन बाहेर काढणारा राजा शिवाजी हा क्षत्रिय कुलावंतास म्हणजे क्षत्रियांची पराक्रमाची गाथा सुरू करणारा ’युग पुरुष’ होय. म्हणुनच शिवाजी महाराजांनी राज्याभिषेकाच्या वेळी, “प्रॊढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावंतास” अशी घोषणा केली. महारष्ट्रातील धर्मपंडीतांनी पुन्हा हे घोष वाक्य बदलुन गेली अनेक दशके “गोब्राम्हण प्रतिपालक राजाधिराज शिवाजी महाराज” असे सांगुन पुन्हा हे राष्ट्र गुलाम करण्याचा प्रयत्न चालविला आहे. इंद्रजालवरुन साभार...

शुक्रवार, १० एप्रिल, २०१५

गोळवशी -माझं गाव

लांजा तालुक्यात साटवली रोडला वसलेले माझ गोळवशी गांव .माझ्या या जन्मभूमिबद्दल थोडस काय आहे ना आज गावची आठवण येत आहे आणि मनाच्या कोपर्यात साठवून ठेवलेल्या आठवणींचा कप्पा अलगद उफाळून वरती येऊ पहात आहे आणि त्याला बंद करणे माझ्याच्याने तरी शकय नाही .या आठवणींची पण वेगळीच गम्मत आहे.काही आठवणी रडता रडता हसवायला लावणाऱ्या तर काही हसता हसता डोळ्यात अश्रु आणणारया,काही अबोल तर काही अविस्मरणीय .गावच्या आठवणीबद्दल माज हेच मत आहे या आठवणी कधींही न विसरता येणाऱ्या -अनमोल याबद्दल प्रत्येकाची मते वेगवेगळी असू शकतात.परंतु आमच्यासारख्या गांव सोडून कामधंद्यानिमीत्त मुंबईत स्थायिक ज़ालेल्या लोकांच्या गावच्या आठवणी काहिशा भावुक असतात. गोळवशी गांव महाराष्ट्राला नविन नाही.गावची ग्रामदेवता आई नागादेवीची ख्याती महाराष्ट्रात सर्वदूर पसरली आहे.महाराष्ट्राच्या कनाकोपर्यातून भक्तगण आई नागादेवीच्या दर्शनाला येत असतात.आमच्या गावचा बायंगी देव खुप प्रसिद्ध आहे.त्यामुळे कोणी मस्करीमध्ये विचारल की तू कुठला रे ?त्यावर मी म्हणतो लांज्याचा.मग समोरचा परत बोलतो लांज्यात कुठे ?त्यावर मी म्हणतो गोळवशी. पुढचा माणूस अतिशय अदबीने बोलायला लागतो.ज्यांना आमच्या गावची महती माहित आहे ते आमच्या वाट्याला जात नाहीत.याचे कैक अनुभव आहेत.माझे आजोबा असे सांगायचे कि पूर्वी आमच्या गावातील आंबा,काजु जमिनीवर जरी पडलेले असले तरी ते उचलण्याची हिंमत आजुबाजूच्या गावातील लोक करत नसत.इतके सगळे वचकुन असत.आणि आजही 2015 साली परिस्तिथी काही वेगळी नाही. तुम्हाला म्हणून सांगतो मित्रहो आम्ही क्रिकेट स्पर्धांसाठी पंचक्रोशी,तालुक्यामध्ये खेळायला जातो.आमच्या संघाच नाव आहे नागादेवी गोळवशी.समोरच्या टिमच्या तुलनेत आमच्याकडे सगळे लींबु-टिंबूचा भरणा असतो.समोरची टीम अगदी जिंकायला आलेली असते .अचानक सामन्याचा रंग पालटतो प्रतिस्पर्धी टिमच्या हातातोंडाशी असलेला घास आम्ही हिरावुन घेतो.समोरचे बिच्चारे अक्षरशः रडत मैदान सोडतात .जाता जाता म्हणतात कि बायंगी उठवलानी वाटत .हसून हसून पोट दुखायची वेळ येते.म्हणतात ना ते नावात काय आहे?नावात बरंच काही आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पुनित झालेला हा गांव.राजापुरला जाताना शिवाजी महाराज गावातुन नदीपार करुन गेले.आणि इंग्रजांची वखार लुटली.गावाच्या सिमेवरून मुचकुंदी नदी वाहते.विशाळगडाच्या पायथ्याला नदिचा उगम होतो.नदिला बारमाही पाणी असते.नदी पुढे पूर्णगडच्या खाडीला मिळते.