शनिवार, ३० मे, २०१५

कुठेतरी छानसे वाचलेले....

" सर, ताक घ्या ना. फक्त १० रुपये " फाटक्या कपड्यातील एक चिमुरडी माझ्या समोर ताकाचा ग्लास धरून उभी होती. तिच्याही तोंडी "सर" शब्द आला हे ऐकून वाईट वाटलं. कारण ठिकाण होतं रायगड किल्ला. ३५० पेक्षा जास्त वर्ष उनपावसाचा मारा सहन करूनही टिकून राहिलेल्या दगडी पायर्यांवर ही मुलगी हातात ताकाची एक किटली, चार ग्लास आणि ग्लास धुवायला बादली घेवून बसली होती. मी ताक घेतलं आणि पिताना तिच्याकडे पाहू लागलो. हाडाची काड झालेली. अजून दुधाचे दात पडले नव्हते आणि पोटाच खळग भरण्यासाठी काबाडकष्ट करू लागली होती. शिवाजी महाराज गेले आणि अश्या असंख्य कष्टकर्यांची रयाच गेली. रायगड भग्न होत गेला आणि ह्यांचं जीवन त्यापेक्षा जास्त भयाण झालं. त्यानंतर अनेक सत्ता आल्या-गेल्या. पण रायगडावर राहणाऱ्या ह्या कष्टाळू लोकांचे कपडे जास्त फाटत गेले. एकेकाळी ह्या रायगडावर आरोळी उठत असे, " चल मर्दा, उपस तलवार. शत्रू कोकणात उतरतोय. आमची शेती जळेल अन आया-बहिणीची अब्रूबी शिल्लक रहायची नाही." मग सपासप तलवारी तळपू लागायच्या. " जय जिजाउ , जय शिवराय ...हर हर महादेव ....यळकोट यळकोट जय मल्हार" सगळे रांगडे गडी शत्रूवर तुटून पडायचे. कांदा भाकर खाणारे मुठभर मावळे दहा हजार फौजेवर काही कळायच्या आधीच हल्ला करायचे. शत्रू तोफेत गोळे भरायला निघायाचा, तोवर मावळ्यांनी अनेकांच्या खांडोळ्या केलेल्या असायच्या. शत्रूच नाही तर महापराक्रम गाजवलेली ती क्रूर तोफसुध्धा शरण यायची. मावळे एका हातात तलवार, आणि एका हातात मृत्यू घेवून फिरत...फक्त महाराजांसाठी!! "सर, अजून एक ताक घ्या ना, फक्त दहा रुपये" मी भानावर आलो. इतिहास इतिहासजमा झाला आणि वर्तमानात उरली दिवसभर रायगडावर ताक विकत फिरणारी ही कन्या. एक ग्लास ताक पिवून झालं होतं. तरीही अस वाटलं आणखी एक ग्लास पिवूया. कारण त्याबदल्यात तिला जे पैसे द्यावे लागतील, तो फक्त तिचा" profit " नसेल तर कष्टाला दिलेली सलामीही ठरेल. हल्ली ह्या कष्टाला कोण सलामी देतं? सिनेस्टार्स, क्रिकेट खेळाडू, गायक आणि राजकारणी ह्यांना पद्म पुरस्कार मिळतात आणि दिवसभर उन्हात उभं राहून ताक विकणाऱ्या मुलीला मिळतात एका ग्लासामागे दहा रुपये. मी तिला विचारलं, "शाळेत जाते का ?" तिने उत्तर दिलं, "जातो की..आम्ही गडावरची सारी मुलं खाली पाचाडमध्ये शाळेत जातो." मी थक्क झालो. अंदाजे १५०० पायर्या उतरून- पुन्हा चढून ही मुले शाळेतही जात होती. रायगडाची उंची आहे 1,३५६ मीटर. पण ह्या इवल्याश्या पोरांची कर्तबगारी आहे आसमंताला भिडणारी. ती मोजायची तर मीटरमध्ये मोजता येत नाही. मीटर त्या शाळेत जाणार्या मुलांना मोजावे लागतात, जे school bus मधून शाळेत जातात-येतात... घरपोच!! इथे रायगडावरील आणि इतर गडांवरील मुले उरलेल्या वेळेत ताक, लिंबू सरबत विकून चार पैसे कमावतात. महाराजांनी चारी बाजूने आक्रमण होतं असूनही स्वराज्य आणलं ते अश्याच गड्यांच्या बळावर...हे जग चालतं ते अश्याच कष्टकर्यांच्या जोरावर .. --असाच एक वाचनात आलेला सुंदरसा लेख ..

शुक्रवार, २९ मे, २०१५

लेखणी बरसु लागते तेव्हा.....

बरेच दिवस झाले लेखणी शांतपणे एका कोपर्यात पहुडली होती.कदाचित तिची मला आठवण झाली नसावी.ही लेखणीच माझी खऱ्या अर्थाने सोबतीण आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.कुठेतरी व्यक्त होण्याची मी संधी पाहत असतो आणि ती मला यामधुन मिळते.प्रसंग लिखाण आणि टिकात्मक लिखाण यावरच माझा जास्त भर असतो. आज अचानक काही गोष्टी नजरेसमोर आल्या म्हणजे तश्या जुन्याच आहेत पण मला मात्र नवख्याच वाटु लागल्या.डोळ्यातली विझत आलेली आग पुन्हा धगधगुन पेटायला लागली.लिखाणातून परत एकदा बरसु लागली. महाभारतात अर्जुनाला सुद्धा स्वकीयांविरुद्ध शस्त्र उचलणे भाग पडले.इतकेच नव्हे तर छत्रपती शिवाजी महाराजांना आपले भाऊ व्यंकोजी राजे यांच्याविरुद्ध शस्त्र उगारावे लागले होते.आणि महाराजांचा हाच आदर्श प्रमाण मानून आपल्याच स्वजनांविरुद्ध लेखणी चालविताना आमचे हात डगमगणार नाहीत याची आम्ही काळजी घेऊ. महाराष्ट्र या शब्दाचा अर्थ म्हणजे महा+राष्ट्र=महाराष्ट्र होय.महा म्हणजेच मराठा आणि या मराठयांचे राष्ट्र म्हणजेच महाराष्ट्र होय.तर अशा या महाराष्ट्रात अनेक ऐतिहासिक, शिवकालीन मराठी घराणी आजही वास्तव्यास आहेत.यातीलच काही मराठा घराण्यानी वतनाच्या ,सत्तेच्या लोभापायी वर्षानुवर्ष सुलतानांची चाकरी करण्यातच धन्यता मानली.सुलतानांच्या दरबारातले मातब्बर सरदार म्हणून हेच मराठे नावारूपास आले.त्यांची आता नावे घेत नाही सुजाण वाचकांस ते ठावुक असेल यात तिळमात्र शंका नाही. यातीलच काहीजण आजही सुलतानांनी दिलेली वतने ,किताब लाखमोलाने मिरवत आहेत.जनतेची दिशाभूल करत आहेत .त्यांना उसने अवसान आणून सांगत आहेत कि आम्ही इतिहासात अशी कामगिरी केली.आपल्या नावापुढे खुशाल राजे लावण्यात यांना अभिमान वाटतो.आम्ही या प्रांताचे राजे,त्या प्रांताचे खोत,कोकणचे राजे ...... काहीजण तर सुलतानराव असे किताब मिरवत आहेत.या लोकांना लाज तरी कशी वाटत नाही?ज्यांच्या नावातच अर्थ दडलेला आहे तोसुद्धा या मुर्खाना कळत नाही.सुलतान सम्राटांनी दिलेले किताब कोणते आणि महाराजांनी केलेले गौरव कोणते?हे कळन्याइतपत आम्ही मुर्ख नाही.त्यामुळे अशा लोकांनी आमच्यापासून दोन हात लांब राहणेच त्यांच्यासाठी सोईस्कर जाईल. याच मराठ्यानी शिवाजी महाराजांना स्वराज्यस्थापनेसाठी मदत केली असती तर आजचा इतिहास काहीतरी वेगळा असू शकला असता.फितुरी ,गृहकलह याचा मराठयांना पिढ्यानपिढ्या शाप आहे.इंग्रजांनी याचाच फायदा घेतला .तोडा,फोडा आणि राज्य करा या नितिचा वापर करुन देशाची विभागणी करुन ते निघुन गेले आणि जाता जाता भांडण लावून गेले.आजही त्याचे परिणाम आपण भोगत आहोत. आताही आमच्यामध्ये एकी निर्माण झालेली नाही.एकमेंका सहाय्य करू अवघे धरु सुपंथ.या वचनाचा आम्हाला विसर पडला आहे.आपलेच भाऊबंद वरच्या पायरीवर जात असतील तर आपण त्यांना तळाची पायरी दाखवून आसुरी आनंद साजरा करत आहोत.इतिहासात पण आपण हेच करत आलो आहोत आणि आताही परिस्तिथी काही वेगळी नाही . काय करू शब्द खुप आहेत पण लिहिन्याची इच्छा नाही. Bhalekar117.blogspot.com किरण भालेकर

बुधवार, २७ मे, २०१५

ट्रेकर्सची लक्षणे

१.चेहरा: बहुधा रापलेला . दाढ़ी मिश्यांचे नक्कीच काहीना काही कीडे केलेले असतात . त्यातहीकिंवा सैफच्या टशन स्टाइल मिश्या यांच्या फार आवडत्या . काही ट्रेकर्स असेहीअसतात जे दाढ़ी मिश्या ठेवत नाहीत त्यांना मुली असे म्हणतात २.केस: एकतर अतिशय बारीक़ कापलेले किंवा खुप लांब ..मुले मुली दोघांचेही ३.वेशभूषा: आठवड्यातील दिवसाप्रमाणे * सोमवार ते गुरुवार: चेक्सचा शर्ट , जीन्स, पायात चप्पल. खांद्याला चिंगुली सैक हीला ट्रेकच्याभाषेत पिट्टूम्हणतात . त्याला एखादा snap किंवा रंगीबेरंगी स्लिंग जरुर अडकवलेली असते. * शुक्रवार रात्र: निघायची तयारी …ख़राब फीटिंगची पण प्रचन्ड comfortable ट्रैक पँट , Bombay Natural History Society चे कुठल्या तरी दुर्मिळ पक्ष्याचा फोटो असलेले टी शर्ट , कमरेला वेस्टपाउच (ही एकखासचीज आहे …हिच्याविषयी विस्ताराने पुढे येईलच ) ,पायात अनुभवी बनचुका ट्रेकरअसल्यास स्लीपर / मध्यम अनुभवी असल्यास फ्लोटर्स / अगदीच नवखा असल्यास भारी बूट * शनिवार दुपार ते रविवार दुपार: वर उघडाबंब , डोक्यात माकडटोपी , खाली ट्रैक पँट …काही ट्रेकर्सउघडे नसतात त्यांना मुली असे म्हणतात ४.सापडण्याची जागा: आठवड्यातील दिवसाप्रमाणे * सोमवार ते शुक्रवार सकाळ: आपापला धंदा नोकरी व्यवसाय …नाईलाजाने. * शुक्रवार रात्र: CST स्टेशनच्या मोठया घडयाळाखाली … ही trek साठी भेटण्याची जागा. * शनिवार पहाट: कर्जत, मुरबाड, लोणावळा, कसारा, इ. इ. S T stand * शनिवार दुपार ते रविवार दुपार: कुठल्यातरी गडावरील केव्ह ५.अन्य विशेष लकबी: * हे कुठल्या ना कुठल्या ट्रेकिंग क्लबचे मेंबर जरुर असतात , पण ९० % वेळा दुसर्या club बरोबरट्रेकला जातात * ट्रेकला वा शहरात कुठेही कोणताही प्लास्टीकचा कचरा टाकत नाहीत …. साधी गोळी जरी खाल्लीतरी कागद व्यवस्थीत खिश्यात ठेवतात . कोणत्याही प्रदूषणाचा यांना तिटकारा असतो . पणकिल्ल्यावर केव्हमध्ये कधी कधी ध्वनी + वायु प्रदुषण जरुर करतात त्यातही त्यांची फारशी चूकनसते . रात्री उशिरा निघणे, वेळी- अवेळी खाणे, दगदग यामुळे बिचार्यान्चे पोट थोड़े फार बिघडते * बोलता बोलता मध्येच खालील शब्द फेकतात : आजोबा, अलंग, कुलंग, कोल,केव्ह, traverse , तिकोना, पिंचहोल्ड, हंप इत्यादी इत्यादी * यांचे एकंदरीत काम अगदी सुबक असते , एखाद्या सराईत गृहिणीसारखे : उदाहरणार्थ सैकमध्येप्लास्टीकची पिशवी, तिच्यात कपडे, कपड्यांच्या घदीत प्लास्टीकची छोटी पिशवी, तिच्यात छोटीडबी , तिच्यात कागदाची पुडी आणि तिच्यात शिट्टी यांचा wastepouch ही एक धमाल चीजअसते : यात caluclator , nail कट्टर पासून सुई दोर्यापर्यंत जगातील काहीही अफलातून गोष्ट असतेएका ट्रेकरच्यापाउच मध्ये मी एकदा फॉर्म १६ A बघीतला होता आता बोला सैक सुद्धा अशी सुरेखभरतील की पाहत रहावं . ६.खाण्या पिण्याच्या सवयी: * कशालाही नाही म्हणणार नाहीत हवे ते हक्काने मागून घेणार * काहीतरी विचित्र करून दुसरयाचे लक्ष वेधून घेण्याची वाईट खोड . बिस्किटे पाण्यात बुडवून खाणे , श्रीखंड पाव , केळ पाव खाणे इत्यादी * पाणी अतिशय जपून वापरतात . बाटलीतील पाणी ओतायची यांची खास पद्धत असते . बाटलीचेझाकण उघडून बाटलीच्या तोंडावर डाव्या हाताची तर्जनी आणि मधले बोट दाबून धरायचे आणिथोडीशी मोकळी जागा ठेवून बाटली हळूवार कलती करायची यामुळे पाणी भस्सकन पडत नाही ७.गडावर असताना यांची करमणुकीची साधने: * खणखणित आवाजात पोवाडे गाणे * जुन्या ट्रेकच्या आठवणित रमणे * बैटिंग ला जाणे ८.यांची दैवते: * offcourse शिवाजी महाराज * रायगडचा जगदीश्वर * हरिश्चंद्र गडाचा खिरेश्वर , रतन गडचा अमृतेश्वर इ . इ . ९.यांची तिर्थस्थळे: * राजमाचीचा तलाव * बाण चा ब्लू लगून * नाणे घाटातील केव्ह * कोंकण कडा इ . इ . आणि हो ज्याप्रमाणे प्रत्येक आज्जीचं एकदातरी काशीयात्रा करण्याचे स्वप्न असते त्याचप्रमाणेप्रत्येक ट्रेकरचे निम् (नेहरू इंस्टिट्यूट ऑफ़ mountaineering) ला जाऊन बेसिक कोर्स complete करून A ग्रेड घेउन यायचे स्वप्न असते १०.ट्रेकर्स विषयी काही मोठ्ठे गैरसमज * यांना मुली आवडत नाहीत काही म्हणी आणि वाक्प्रचार : * खाईन तर तुपाशी नाहीतर……… adjust करेन * वाट पाहीन पण एस टी नेच जाईन * केव मध्ये “आला वारा गेला वारा” तो कुणाचा सोयरा * An alive ordinary rock climber is always better than an excellent dead rock climber !!! महाजालवरुन साभार .

राजा शिवछत्रपती...

इतिहासाला जशी तमा नाही इथल्या पराक्रमाची, मोडेल पण वाकणार नाही अशी आण असे आम्हां शिवरायांची, ईथे गडकोटांना साथ मिळते गगनभेदी सहयाद्रीची माणसाने माणूस जोडावा हिच शिकवण आमुच्या मराठी संस्कृतीची, संकटांना आशा असते धैर्याने सामोरे जाण्याची जय शिवराय...