रविवार, ३० ऑगस्ट, २०१५

शनिवार, २९ ऑगस्ट, २०१५

रक्षाबंधन -पवित्र सण


रक्षाबंधन म्हणजे बहिण-भावाच्या प्रेमाचे बंधन! या दिवशी बहिण भावाच्या हातावर राखी बांधून भावाचे ह्दय प्रेमाने जिंकून घेते. हा सण म्हणजे पराक्रम, प्रेम, साहस किंवा संयमाचा संयोग होय.जगातील सर्व नात्यांमध्ये भाऊ-बहिणीचे प्रेम निस्वार्थी आणि पवित्र असते. भारतीय संस्कृतीतील पूर्वजांनी या नात्यातील निस्पृहता आणि पवित्रतेचा महिमा गायला आहे. भारतीय संस्कृती मानव जीवनाच्या महानतेचे दर्शन घडविणारी संस्कृती आहे. स्त्रीला भोगवस्तू न समजता तिची पूजा करणारी संस्कृती आहे. स्त्री समानतेची पोकळ भाषा बोलणार्‍या सुधारकांना किंवा पाश्चात्य संस्कृतीचे अनुकरण करणार्‍यांना नम्रतापूर्वक सांगितले पाहिजे, की भारतीय संस्कृतीने स्त्रीची पूजा केली आहे. 'यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवता:' जिथे स्त्रियांची पूजा, तिचा सम्मान केला जातो तिथे देवांचा वास असतो असे मनूने म्हटले आहे. स्त्रीकडे भोगाच्या दृष्टीकोनाऐवजी पवित्र दृष्टीने, आईच्या भावनेतून पाहण्याचा संदेश देणारी भारतीय संस्कृती आहे. रक्षाबंधनाचा सण म्हणजे दृष्टी परिवर्तनाचा सण! बहिणीने हातावर राखी बांधताच भावाची दृष्टी बदलते. राखी बांधणार्‍या बहिणीकडे तो विकृत नजरेने पाहत नाही. समाजात आपली बहिण ताठ मानेने वागावी म्हणून तिच्या संरक्षणाची जबाबदारी स्वतःकडे घेतो. मात्र आज तिची मस्करी करणार्‍या आणि जनावरांप्रमाणे वागणूक देणार्‍या भावांना समजावून सांगण्याची गरज आहे. बहिण भावाला राखी बांधण्यापूर्वी त्याच्या कपाळावर टिळा लावते. हे केवळ भावाच्या कपाळाची पूजा करण्यासाठी नव्हे तर त्याचे विचार आणि बुद्धीवरील विश्वासाचे दर्शन आहे. भावाच्या कपाळावर टिळा लावताना सामान्य वाटणार्‍या या क्रियेत दृष्टी परिवर्तनाच्या महान प्रक्रियेचा समावेश आहे. सामान्य दृष्टीने जगाकडे पाहणार्‍या नजरेशिवाय भावनात्मक दृष्टीने जगाकडे पाहण्यासाठी एक पवित्र तिसरा डोळा बहिणी आपल्या भावाला देऊन त्रिलोचन बनविते, असा संकेत या क्रियेमध्ये दिसून येतो. भगवान शंकराने तिसरा डोळा उघडून मदनाला भस्म केले होते. त्याप्रमाणे तिसर्‍या डोळ्याच्या रूपात बहिण भावाला आजार, वासना इत्यादी भस्म करण्याची सूचना करते. बहिण भावाच्या हातावर राखी बांधून केवळ आपले संरक्षण मागत नाही, तर सर्व स्त्री जातीच्या संरक्षणाची मनोकामना ठेवते, तसेच बाह्य शत्रूपासून आणि अंतर्विकारांपासून आपला भाऊ विजय प्राप्त करो किंवा सुरक्षित राहो ही भावना पण त्यात असते. देवासुर संग्रामात देवांच्या विजयासाठी इंद्राणीने हिम्मत हरवलेल्या इंद्राच्या हातात राखी बांधली होती, असे वेदात सां‍गितले आहे. अभिमन्यूच्या सुरक्षेसाठी कुंतीने त्याला राखी बांधली होती आणि आपल्या संरक्षणासाठी राणी कर्मवतीने हुमायूँला राखी पाठवली होती. या राखीमध्ये सुरक्षिततेची भावना होती. रक्षाबंधन हे सुरक्षिततेचे स्मारक आहे. राखी बांधल्याने एक बंधन आपल्यावर असते. हे बंधन असते ध्येयच्युत न होण्याचे. या ध्येयाच्या दिशेने वाटचाल करण्याची आठवण राखी देते. राखी बांधताना बहिण भावाचे बंधन किंवा ध्येयाचे रक्षण करण्याची सूचना करते. ''स्त्रीकडे विकृत दृष्टीने न पाहता तिच्या प्रती पवित्र दृष्टी ठेवा'' असा महान संदेश देणार्‍या या भारतीय संस्कृतीच्या सर्वश्रेष्ठ सणाला आपण कुटुंबापुरतेच मर्यादित ठेवले आहे. अशा सुंदर प्रेम आणि भावबंधनाच्या सणाला कुटूंबापुरतेच मर्यादित ठेवणे योग्य नाही. सख्या भावाकडे बहिणीची दृष्टी निर्मळ आणि प्रेमपूर्ण राहील. समाजात स्त्रीकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलण्याची आवश्यकता आहे. सख्ख्या बहिणीने सख्ख्या भावाला राखी बांधण्यापेक्षा समवयस्क एखाद्या बहिणीने दुसर्‍या भावाला राखी बांधल्यास त्यामध्ये शील रक्षणाची जबाबदारी येते. सारांश, रक्षाबंधन म्हणजे स्त्रीकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलणे, रक्षाबंधन म्हणजे भावाने बहिणीच्या रक्षणाची जबाबदारी घेणे, रक्षाबंधन म्हणजे बहिण-भावाच्या शुद्ध प्रेमाचा वाहता निर्झर! भाऊ आणि बहिण परस्पर प्रेरक, पोषक आणि पूरक आहेत हा संदेश देणारा हा उत्सव भारतीय संस्कृतीची अमूल्य देन आहे.

बुधवार, २६ ऑगस्ट, २०१५

भटकंती 3


रायगड जिल्ह्यातील नागोठणे जवळील सुकेळी खिंडी जवळ खांब गाव नजिक सुरगड किल्ल्‌याला देखील भेट देण छान वाटेल. मुंबईहून महाडकडे जाताना याच सुकेळी खिंडीआधी एक रस्ता डाव्या बाजूस जातो आणि त्या रस्त्याने पुढे गेल्यास गाडी रस्ता संपतो आणि जंगलातील मळलेली पायवाट सुरु होते. याच पायवाटेने साधारण २० मिनिटानंतर एक उंच धबधबा दिसतो. त्या धबधब्याचे पडणारे पाणी आणि वाहणारी नदी हे एक अतिशय सुंदर आणि सुरक्षित ठिकाण आहे. रायगड जिल्ह्यात खोपोली पाली रस्त्यालगत दुरशेत गावाआधी उंबरखिंड हे एक ऐतिहासिक स्थान आहे. खंडाळ्याच्या डोंगरातून पडणारे पाणी उंबरखिंडीत येते आणि नदीमार्गे कोकणात जाते. पावसाळ्यात उंबरखिंडीत जाणे म्हणजे सर्वाना नक्कीच आवडेल. दुरशेतहून पुढे जांभूळपाड्यामार्गे भेलीव गावालगतचा मृगगड हा किल्ला आणि त्याकडे जाणारा नदीलगतचा मार्ग आपणास भुरळ पाडतो. गणपतीच्या पाली गावाआधी ठाणाळे हा लेणी समूह आणि त्याच्या आजूबाजूचा परिसर पावसाळ्य ात आपले वेगळे रूप दाखवतो. पाली गावालगतच सरसगड हा किल्ला आहे, आणि तेथून पुढे असणारा सुधागड किल्ल्याला देखील पावसाळ्य ात भेट देण मस्तच. रत्नागिरी जिल्ह्यातील देवरुखजवळील मार्लेेशरला पावसाळ्यात जाणे म्हणजे स्वर्गसुखच. तिन्ही बाजूनी उंच डोंगर त्या वरून वाहणारे हजारो छोटे मोठे धबधबे, एका बाजूला वाहणारी नदी, आणि म ह ा द े व ा च् य ा मंदिरामागे असणारा भला मोठा धुवाधार धबधबा काय वर्णावा…. … जबरदस्त…… िं स ध ु द ु ग र् ि ज ल् ह्य ा त ी ल आंबोलीत पावसाळ्य ात बरेच निसर्गप्रेमी, पर्यटक जातात. कारण आंबोली आहेच सुंदर. पण आंबोलीला जाऊन फक्त डोंगर – द-या, धबधबे न पाहता तेथे असलेल्या जैव विविधतेचा अभ्यास करण्यासाठी गेले पाहिजे. कारण या भागात अनेक दुर्मिळ पक्षी, फुले, साप, फुलपाखरे, चतुर, बेडूक, वनस्पती इत्यादी आढळतात. पावसामुळे संपूर्ण परिसर जिवंत होतो. जस माणूस लावणी, पेरणीच्या कामाला सुरुवात करतो त्याचप्रमाणे फुलझाडे, वनस्पती, प्राणी, पक्षी, बेडूक, साप, चतुर, फुलपाखरू, पतंग, छोटे-मोठे किडे इत्यादी अनेक सजीवांच्या जीवन चक्रातील हा महत्त्वाचा काळ असतो. प ा व स ा ळ् य ा त फिरण्यास बाहेर पडताना काही गोष्टी लक्षात ठेवाव्यात त्या म्हणजे चांगले शूज, पावसाळी जाकेट, छत्री, सुका खाऊ इ त् य ा द ी आपल्याबरोबर घ्यावेत. आपणास ज्या ठिकाणी जायचे आहे, त्या ठिकाणाची माहिती गोळा करावी आणि तिथे जायला यायला लागणारा वेळ लक्षात घ्यावा आणि त्याप्रमाणे आपल्या भटकंतीचे नियोजन करावे. खूप पाऊस असल्यास किंवा एखादा बाका प्रसंग घडल्यास कुठल्याही प्रकारचे डेरिंग न करता स्थानिक लोकांची किंवा पोलिसांची मदत घ्यावी. प्रत्येकाचा पावसाचा आनंद लुटण्याच्या संकल्पना वेगवेगळ्या असतात. काहीजण गड, किल्ले, ट्रेक्स, जंगल अशा ठिकाणी निसर्गाचा खरोखरीचा आनंद लुटायला जातात तर काही ठिकाणी सध्या पावसाळी भटकंती दरम्यान बरेच तळीराम दृष्टीस पडतात. एक तर अशा ठिकाणी जाण्याचे टाळावे आणि असे काही तळीराम भेटल्यास त्यांच्याशी हुज्जत घालू नये. प्रत्येकाने पावसाचा आनंद अशा वेगवेगळ्या ठिकाणांना भेट देऊन द्विगुणीत करायलाच हवा. चला तर मग.. पाऊस पडण्यास सुरुवात झाली आहे.. निसर्ग आपली वाट बघतोय.. साभार :गूगल संकलक:किरण भालेकर

भटकंती 2


नंदुरबार येथून जवळ असलेल्या तोरणमाळ या ठिकाणची सुंदरता काही औरच आहे. तेथील जंगल, डोंगर – दर्‍या, पक्षी, रंगीबेरंगी फुले आपले मन प्रसन्न करून टाकतील यात वादच नाही. नाशिक पुढील चाळीसगावाजवळील पावणादेवी आणि त्या परिसरातील जंगल हे पावसाळ्यात जाण्याजोगे अजून एक ठिकाण होय. तेथे असलेला कण्हेरगड किल्ला आणि केदारेेशर धबधबा पाहण्यासारखा आहे. चिखलदरा हे अमरावतीहून जवळ असणारे आणि विदर्भवासियांचे आवडते ठिकाण. तेथे असणारा गाविलगड किल्ला, किचकदरा इत्यादिसारखी बरीच ठिकाणे पाहण्यासारखी आहेत आणि पावसाळ्यात या हिल स्टेशनची मजा काही न्यारीच असते. चिखलदर्‍याहून जवळच मेळघाट व्याघ्र प्रकल्प आहे. पावसाळ्यातील दाट जंगल अनुभवायचे असेल तर मेळघाटला भेट देण्याशिवाय पर्याय नाही. चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा व्याघ्र प्रकल्पालादेखील पावसाळ्यात भेट देण उत्तम. मंगळवारखेरीज वर्षभरात कधीही ताडोबाला जाता येते आणि पावसाळ्यातील या जंगलाचे वर्णन करण्यास शब्दच नाहीत, पण या सर्वासाठी तीन ते चार दिवस असावेत. सातारा जिल्ह्यात सध्या एका ठिकाणाचे नाव खूप गाजत आहे………. हो……….. बरोबर ओळखलतं……… कास चे पठार. कासचे पठार म्हणजे महाराष्ट्रातीन व्हॅली ऑफ फ्लोवर्स आहे. साधारण सप्टेंबर महिन्यात या पठारावर असंख्य विविधरंगी फुले फुलतात आणि त्याचा आनंद घेण्यासाठी – पाहण्यासाठी हजारो लोक तेथे भेट देतात. कासबरोबरच साता-याजवळ नदीकिनारी आणि जुन्या मंदिरांचा समूह असणार्‍या माहुली या ठिकाणी नक्की भेट दिली पाहिजे. त्याचप्रमाणे अजिंक्यतारा, सज्जनगड देखील मस्तच आणि येथून जवळ असलेल्या ठोसेघर धबधब्याची सुंदरता म्हणजे अप्रतिमच होय. सातारहून ८ कि.मी. असणा-या कण्हेर धरणाला सुद्धा भेट देता येईल. कोल्हापूर जिल्ह्यातील प्रसिद्ध असणा-या पन्हाळगडावर पावसाळ्यात बरेच जण जातात. पावसाळ्यातील पन्हाळगड आणि परिसर सुंदरच दिसतो पण काही लोकांना तेथे वेगळा अनुभव घ्यायचा असेल तर पन्हाळगड ते विशाळगड हा पावसाळी ट्रेक नक्की करावा. ज्या वाटेने छत्रपती शिवराय पन्हाळगडाच्या वेढ्याला चकमा देऊन विशाळगडाकडे गेले आणि ज्या ठिकाणी बाजीप्रभूंनी आपल्या प्राणाची आहुती दिली त्या पावनखिंडीहून हा ट्रेक जातो. मसाईचे विस्तीर्ण पठार, शेती, जंगल, ओढे, नदी, नाले, छोटी छोटी गावे अशा ठिकाणांहून हा ट्रेक पूर्ण होतो. ज्यांना पावसाळी थ्रिलिंग अनुभवायचे आहे त्यांना हा ट्रेक म्हणजे पर्वणीच. हा ट्रेक आयुष्यात एकदा तरी करायालाच हवा. मुंबई येथील भरारी गिर्यारोहण संस्था हा ट्रेक गेली १२ वर्षे यशस्वीरित्या आयोजित करते आहे. त्याच प्रमाणे विशाळगडाजवळ असणारा गजापूर ते आंबा आणि आंबा ते साखरपा हा घाटरस्तादेखील धमाल देऊन जातो. पुण्याहून भोरमार्गे महाडला जाणा-या वाटेवर वरंधाघाट लागतो. वरंधाघाटा लगतच कावळ्या नामक किल्ल्याला देखील जाऊ शकतो. पावसाळ्य ात वरंधाघाटाला जाणे म्हणजे एक जबरदस्त अनुभव आहे. डोंगरातून वाहणारे छोटे मोठे झरे, धबधबे, बाजूला खोल दरी आणि त्या दरीत दिसणार छोटास गाव, आणि त्या गावालगत वाहणारी नदी असे वेड लावणार सौंदर्य वरंधाघाटात आहे. वरंधा घाट उतरल्यावर समर्थ रामदास स्वामींचे वास्तव्य लाभलेले शिवथरघळ येथील गुहा आणि त्या गुहेबाहेर पडणारा पाऊस – धबधबा पाहणे म्हणजे क्या बात है…… महाराष्ट्रात अगदी हाताच्या बोटावर मोजण्याइतकी काही ठिकाण आहेत की जिथे आपण गुहेच्या आत असतो आणि गुहेबाहेर समोरून पाणी पडत असते. शिवथरघळ हे त्यातील एक ठिकाण आहे. निसर्ग संपन्न असणारे कोंकण पावसाळ्यात अजून सुंदर दिसू लागते. उंच हिरवेगार डोंगर, दुथडी भरून वाहणा-या नद्या, खवळलेला समुद्र, लांबवर पसरलेली हिरवीगार भातशेती आणि शेतीच्या कामाची लगबग असणारी कोंकणातील भोळी भाबडी माणस आणि या सर्वाबरोबर पावसाळ्यातील कोंकण म्हणजे मज्जाच. छत्रपती शिवरायांचे राजधानीचे ठिकाण म्हणजे रायगड. पावसाळ्यात रायगडला जाणे म्हणजे वा…….. ह….. असे म्हणतात की, पावसाळ्यातील रायगड एकदातरी अनुभवा. जे लोक इतर अनेकवेळा रायगडावर गेले आहेत आणि जे लोक पावसाळ्यात गेले आहेत ते या म्हणण्याशी नक्कीच सहमत असतील. साभार :गूगल

भटकंती 1


पाऊस सुरु झाला की लगेचच मित्रमंडळी, कुटुंबियांसोबत या पावसाळ्यात कुठे कुठे जायचे याचे आराखडे बांधाले जातात आणि वेगवेगळ्या स्थळांची माहिती गोळा करण्याची लगबग सुरु होते. परंतु तीच तीच ठिकाणं आणि तिकडची गर्दी आठवली की बर्‍याच जणांचा हिरमोड होतो. म्हणून प्रत्येकाला थोडसं ऑफबीट, वेगळ्या ठिकाणी जायला नक्की आवडेल. महाराष्ट्राचा संपूर्ण प्रदेश नितांत सुंदर आहे. महाराष्ट्राला सुंदर सागरी किनारा, अनेक नद्या तसेच सह्याद्री-सातपुडासारख्या डोंगररांगा, जंगल, अभयारण्ये, मंदिरे, गडकिल्ले, इत्यादी ब-याच गोष्टी लाभलेल्या आहेत. त्याचप्रमाणे छत्रपती शिवरायांचा पराक्रम आणि इतिहासदेखील लाभला आहे. मुंबई ते चंद्रपूर आणि सावंतवाडी ते तोरणमाळ या संपूर्ण प्रदेशात पावसाळ्यात जाण्यासाठी बरीच ठिकाण आहेत. पुण्याजवळच असलेली ज्ञानदेवांची आळंदी, तुकोबारायांचा भंडारा डोंगर, देहू, संभाजी महाराजांचे स्मारक असलेले आणि नदी संगमावर वसलेले तुळापूर, तसेच राजगड, सिंहगड, तोरणा, पुरंदर, सोनोरी, इत्यादीसारखे बरेच किल्ले आहेत. त्याचप्रमाणे लोणावळ्याचे भुशी धरण, त्यापुढे असणारी टायगर लीप दरी, या ठिकाणी बरीच लोक जातात पण तेथून जवळच असलेला कोरीगड, तैल बैला, घनगड, कैलासगड इत्यादीसारख्या किल्ल्यांना पावसाळ्यात भेट देण म्हणजे काही औरच मजा आहे. लोणावळ्याजवळील कार्ला – भाजे लेण्या, लोहगड , विसापूर, राजमाची, तुंग, तिकोना यासारखे किल्लेदेखील एका दिवसात भेट देण्याजोगी ठिकाण आहेत. तिकोन्याच्या वाटेने पुढे पौडमार्गे मुळशी धरणाला रस्ता जातो, तोच रस्ता खाली कोंकणात माणगाव-कोलाडला उतरतो आणि हाच तो ताम्हिणी घाट. मुळशी धरणाच्या काठाकाठाने जाणारा हा गाडी रस्ता अतिशय सुंदर असून एकीकडे धरणाचा पाणवठा आणि त्याचबरोबर उंच डोंगर आणि खोल द-याचा देखावा एक अविस्मरणीय आनंद देतो. याच रस्त्यावर विंझणे गावात विंझाई देवीचे सुंदर मंदिर आहे आणि त्या मागे एक अतिशय चांगले जंगल आहे. हे जंगल निसर्गप्रेमींसाठी एक नंदनवनच आहे. येथे विविध प्रकारचे साप, बेडूक, पशु-पक्षी, फुल पाखरे, वनस्पती इत्यादीचा अभ्यास करता येईल. माळशेज घाटाचे सौंदर्य बर्‍याचजणांनी अनुभवले असेल पण त्याचबरोबर माळशेजघाटा आधी मुरबाडजवळ असणारा पळूचा धबधबा हे एक उत्तम स्थळ आहे. याच्यामागे असणारी भीमाशंकरची डोंगररांग पावसाळ्यात विलोभनीय दिसते आणि त्याचबरोबर आपण गोरखगड, सिद्धगड, मच्छिंद्रगड इत्यादी एक दिवसाचे ट्रेकसुद्धा करू शकतो. मुरबाड माळशेज रस्त्यावर वैशाखरेहून पावसाळ्यात ट्रेक करण म्हणजे एक वेगळच थ्रिल आहे. ठाणे जिल्ह्यातील जव्हार – म्हणजे गरिबांचे महाबळेेशर असा ज्याचा उल्लेख केला जातो असे एक वेगळे आणि डोंगर- द-या, असंख्य धबधबे, दूरवर पसरलेली भातशेती, यांनी नटलेले छोटेसे हिल स्टेशन असून पावसाळ्यात हे अतिशय सुंदर दिसते. तेथील राजवाडा, हनुमान टेकडी, शिर्पा माळ, दाभोसा धबधबा इत्यादी ठिकाण पाहण्यासारखी असून, ठाणे जिल्ह्यातील आदिवासी – कातकरी लोकांचे राहणीमान बघण्याचे जव्हार हे उत्तम ठिकाण आहे. जव्हारहून कसार्‍याला जाणार्‍या रस्त्यावर देवबांध या गावी नदी किनारी गणपतीचे अतिशय सुंदर मंदिर आहे आणि याच रस्त्याने पुढे गेल्यावर कसार्‍या घाटाअलीकडे बळवंतगड हा छोटासा किल्ला देखील पाहण्यासारखा आहे. जव्हारहून मोखाडमार्गे त्र्यंबकेश्‍वर येथे जाता येते. त्र्यंबकेश्‍वराचे दर्शन घेऊन ब्रम्हगिरी पर्वतावर जाताना वाटेत अनेक धबधबे आपले मन मोहून टाकतात. येथे ब्रम्हगिरी पर्वताची परिक्रमा देखील करता येते. ही परिक्रमा करताना छोटे मोठे ओढे, उंच डोंगरावरून पडणारे धबधबे इत्यादी बघताना परिक्रमा कधी पूर्ण होते हे कळतच नाही. त्याच प्रमाणे नाशिक त्र्यंबकेेशर परिसरात असणारे कावनई, गडगडा, त्रिंगलवाडी, हरिहर, बसगड, अंजनेरी इत्यादीसारख्या ब-याच किल्ल्यांची सैर पावसात करता येते. ठाणे जिल्ह्यातील वाडा या गजबजलेल्या गावापासून एक रस्ता जंगलातून नदी किना-याहून वासिंदला जातो. माहुली किल्ल्याच्या मागे असणा- या या रस्त्याने पावसाळ्यात जाणे म्हणजे धमालच आहे. त्याचप्रमाणे ठाणे – नाशिक महामार्गावर आटगावहून तानसा अभयारण्याकडे जाणारा रस्ता आहे आणि याच महामार्गाजवळ भातसा धारणाकडे जाणारा रस्ता आहे, इथेदेखील एक दिवसीय पावसाळी सहलीला जाण्यासाठी काहीच हरकत नाही. महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर असणारे कळसुबाई आणि तेथून जवळच असणारा भंडारदरा, रंध धबधबा येथे पावसाळ्यात भेट देणे म्हणजे ऐशच. भंडारद-या जवळ असणारे अमृतेेशर मंदिर आवर्जून पाहण्यासारखे आहे. त्याचप्रमाणे येथील साम्रात गावाजवळील सांधण दरी आपले पैसे वसूल करते. रतनगड किल्लादेखील याच परिसरात असून अनेक ट्रेकर्स मंडळी रतनगड ते हरिश्चंद्रगड असा ट्रैक देखील करतात. साभार :गूगल

रविवार, २ ऑगस्ट, २०१५

भीमाशंकर _शिडीघाट,गणेशघाट


खुप दिवसांत घराबाहेर पडणे जमले नाही त्यामुळे स्वभाव थोडासा चिडचिडा बनला होता.महिन्यातून एक वारी सह्याद्रीत झाली नाही तर आमच्यासारख्या गिरीमित्रांना चैन पडत नाही. रोज इंटरनेटवर गड़कोटांची माहिती जमा करणे आणि मोहिमांची आखणी करणे हा आमचा नित्याचा उद्योग.10 ते 12 ट्रेकिंगचे प्लान अगदी हिशोबासकट पाठ.यापैकी प्रत्यक्षात किती उतरतात आणि कागदावर किती हा कळीचा विषय आहे.त्यात भरीसभर रविवारी सुट्टी नाही.मग सगळे जग घरी आणि आम्ही मात्र कामावर आणि सोमवारी सगळे जग कामावर आम्ही मात्र घरी ...रटाळवाणे आयुष्य म्हणजे नेमके काय?हे एव्हाना कळले होते. या सर्व व्यापातुन एक दिवस चक्क ऑफिसला दांडी मारून केलेल्या भीमाशंकर ट्रैकच्या आठवणी आपल्यासमोर ठेवत आहे. नेटवर सर्च करत असताना एक दिवस भीमाशंकर ट्रैकविषयी कळले आणि त्यात 3500 फुट.महटल्यावर आमच्यातले ट्रेकिंगचे भुत काही स्वस्थ बसु देईना.यात्रीसह्याद्री ट्रेकर्स मुंबई यांनी हा ट्रैक आयोजित केला होता.बऱ्याच जणांना आवताणे निमंत्रणे पाठवुन झाली.परंतु काहीच प्रतिसाद आला नाही त्यामुळे थोड्याशा रागामध्ये तडकाफडकी भीमाशंकर ट्रैकसाठी नोंदणी करुन मोकळा झालो.ट्रैकच्या एक दिवस अगोदर माझा कॉलेजचा मित्र प्रीतम कातकर ट्रैकसाठी तयार असल्याचे कळले.संध्याकाळी त्याला जावून भेटलो आणि त्याची सुद्धा नोंदणी केली. बोरीवलीतुन बसने रात्री 11 वाजता प्रवासाला सुरुवात झाली.प्रितेश पिसाळ आणि दत्ता हे दोन TeamLeader होते.त्यांनी योग्य त्या सूचना दिल्या आणि आम्ही मार्गस्थ झालो.बांद्रा,सायन,चेंबूर,वाशी,पनवेल या मार्गाने आम्ही Base Village खांडस गावात पोहोचेपर्यंत 3 वाजून गेले होते.गावामध्ये विश्रांतीसाठी घराची सोय करण्यात आली होती.बऱ्याच दिवसांनी गावच्या कौलारु घरात आरामात पहुडलो होतो मग काय कोकणातल्या माझ्या घराची आठवण आल्याशिवाय कशी राहील ! ट्रेकिंगसाठी बाहेर जाताना मी कधीही झोपत नाही चांगल्या ट्रेकर्सचे ते एक खास लक्षण आहे आणि ते माझ्यामध्ये अनुभवानेच आले आहे.बरोबर 5चा अलार्म वाजला आणि त्याच आठवणींच्या गर्तेतून बाहेर आलो. सर्व आवश्यक सामान घेवून व्यवस्थीत बॅग भरली. ट्रैकिंगची माझी आवडती रेड जर्सी,ट्रॅकपैंट,शूज आणि पाठीवर सैक घेवून सज्ज झालो.तोपर्यंत गरमागरम कांदापोहे घरातील काकानी नाश्त्यासाठी तयार केले होते.1 Plate कांदापोहे पोटात ढकलले आणि निघालो. घराच्या अंगणात पाऊल ठेवतो न ठेवतोय तोच पावसाने पहिली सलामी दिली.माझा आनंद तर गगनात मावेना.कारण काय तर आज मनमुराद भिजायला मिळणार याची खात्री पटली होती. 6वाजले होते सर्वजण वाटेला लागले.मध्येच पावसाची एक सर ओलीचिंब करून जात होती. भिमाशंकरला जाण्याचे प्रामुख्याने दोन मार्ग आहेत.1)शिडीघाट 2)गणेशघाट. काठेवाडी गावातील पुलाच्या येथे वाहनतळ आहे.पुलाच्या उजवीकडे सरळ रस्ता जातो तो गणेशघाटाला मिळतो.आणि पुलाच्या समोर जी वाट जाते ती शिडीघाटाकडे जाते. सर्वसाधारणपणे मुंबईतील ट्रैकर्स क्लब शिडी घाटाने चढाई करून गणेश घाटाने उतरणे पसंत करतात.शिडी घाटाच्या सुरुवातीला एक विहीर लागते.तिथे गोलाकार उभे राहून नेहमीप्रमाणे ओळखपरेड झाली.आमचा एकुण 26 जणांचा ग्रुप होता.त्यातले 15 जण नवखे ट्रेकर्स.सह्याद्री म्हणजे काय चीज आहे हे कदाचित त्यांना ठावुक नसणार.त्यांचा अतिउत्साह आणि जोश बघुन मला हसु येत होतं.सर्व आवश्यक सूचना दिल्यानंतर आम्ही निघालो.सरळ पठारावर आल्यावर पहिल्या सह्यकड्याने दर्शन दिले. अजस्त्र ताशीव कातळकडा आणि त्यावरून पडणारे धबधबे ...अतिशय मनोहर दृश्य आठवणींच्या कैमेऱ्यात कायमचे कैद झाले.इथे एक मस्त ग्रुपफोटो घेण्यात आला.पुढे वाटेतच जोरदार आवाज करत वाहणारा ओढा नजरेस पडतो.इथे पाण्यात भिजण्याचा व फोटोग्राफीचा मोह काही केल्या आवरत नाही. पायवाट संपून आता सरळ जंगलात घुसलो.वादळी पावसामुळे झाडांच्या फांद्या तुटून वाटा बंद झालेल्या होत्या.दत्ता सर थोडेशेे बावचळल्यासारखे वाटले त्यांच्यावर बाकीच्या मेंबरची जबाबदारी होती त्यामुळे ते पाठी थांबले.आणि मी आणि माझा मित्र पुढे होऊन वाट शोधु लागलो.सोबत 2 कुत्रे होते त्यामुळे वाट शोधणे आणखी सोपे गेले.पहिल्या शिडीपर्यन्त 1.30 तासाची मजल आम्ही मारली होती. शिडीजवळच परत एक कातळकडा आणि त्यावरून कोसळणारा जलप्रपात ... तुम्ही कितीही मनाशी ठरवा पण या धबधब्याखाली पूर्ण समाधान होईपर्यन्त भिजल्याशिवाय शिडीला स्पर्श करणार नाही याची माझ्याकडे Gurantee आहे. शिडी अत्यंत मजबूत अवस्थेत आहे पण 2 टप्पे असल्यामुळे एकावेळी एकच व्यक्ती चढू शकते.शिडी पार केल्यानंतर विसाव्यासाठी गुहेसारखी जागा आहे.आणि तोंडासमोरच प्रचंड आवाज करत कोसळणारा धबधबा..आणि बरोबर डाव्या हाताला पदरगडाचा मनमोहक देखावा आपले लक्ष वेधुन घेतो. या Patch नंतर लगेचच दूसरी शिडी आपले स्वागत करते.हि शिडी स्वताबरोबर आपल्याला पण हलवते.शिडी पार केली की अगदी कड्याच्या बाजूने सरळ वाट पुढे सरकते. येथेसुद्धा एक मस्त धबधबा आहे.जिकडे पहाल तिकडे फक्त धबधबे आणि अजस्त्र कातळकडेच दृष्टीस पडतील.गिरीमित्रांसाठी भीमाशंकर ट्रैकसारखा दूसरा स्वर्ग असुच शकत नाही याची मला खात्री पटली आहे. हा धबधबा पार केल्यावर एक सरळसोट कडा आहे.याला ट्रेकर्सवाले Traverse असे संबोधतात.ईथे नवख्या ट्रेकरसाठी रोपची गरज भासु शकते.आमच्या क्लबने येथे रोपची सोय केली होती. हा patch रोपशिवाय पार केला. हा patch पार करतोय तोपर्यंत Rockpatch सामोरा येतो.उंच दगडाला डावीकडून उजवीकडे प्रदक्षिणा करत हा patch पार होतो. मानसिक क्षमतेची परीक्षा घेणारा असा हा patch आहे. हा पार झाल्यावर शिडीघाट थोड्याच वेळात संपतो.आणि आपल्याला झोपडीचे दर्शन होते.इथपर्यंत 2000 फुट अंतर 4 तासामध्ये पार झाले.गणेश घाटातून येणारा रस्ता सुद्धा याच ठिकाणी एकत्र मिळतो.येथील स्थानिक गावकरी यांनी ईथे चहा,भाजलेल्या मक्याची कणसे लींबु सरबत याची व्यवस्था केली आहे.गवती चहापत्तीचा फक्कड चहा इथली खासियत आहे. वाढत्या पर्यटनामुळे त्यांचा रोजगार प्रश्न मार्गी लागला आहे हे बघुन समाधान वाटले. किरण भालेकर