मंगळवार, ९ डिसेंबर, २०१४

मराठी माणूस ....


खुप दिवसांमध्ये अस सारख वाटत होत की कागदावर काहीतरी उतरवाव ;पण काय ?
मनामध्ये एक आग धुमसत होती .त्या आगिचा केंद्रबिंदु शोधण्याच काम बरेच दिवस करत होतो.
    आज तो विषय मला सापडला असे वाटते.तर मग आढेवेढे न घेता प्रत्यक्ष विषयाला स्पर्श करतो.
     दिल्लीचेही तख्त राखितो मरहट्टा माझा "
हा मरहट्टा म्हणजे नेमका कोण ? मरहट्टा म्हणजे मराठी मातीमध्ये जन्माला आलेला प्रत्येक मानुस.मग तो महार असो अथवा अन्य कोणी असो.तोही माझ्यामते मराठाच आहे अठरापगड जाती कुणी निर्माण केल्या किंवा मराठेशाही मध्ये वर्णव्यवस्था कधी उदयास आली हे सुज्ञ वाचकांस सांगणे न लगे.सिनेमामध्ये ऐकलेले वाक्य काळजावर आघात करत की मराठी माणसाला कुणी कुणी वाली उरला नाही ....
मग काय प्रत्येकाने इथे शिवछत्रपती किंवा रोद्रशंभूंचा अवतार धारण करावयास पाहिजे का ? प्रत्येकाने बंड करुन पेटुन उठायलाच पाहिजे का ?नाही ..........
शिवचत्रपतींचे आचार-विचार ,त्यांनी आपल्यामध्ये जागवून दिलेला आत्मविश्वास की केवळ सात मावळेसुध्या लाखो शत्रुसैन्यावर आपल्या जीवाची पर्वा न करता चालून जातात.इतिहास आणि आपण त्यांना वेडे ठरवून मोकळे झालो.आपल्यापैकी कितिजण आपल्या मुलांना शिवछत्रपतींच चारित्र्य किंवा रामायण ,महाभारत यांसारखी पुस्तके लहानपणी वाचायला देतात .आपली धावपळ कशात असते "अमक्यांच्या मुलाला त्या प्रसिद्ध क्लासला घातल मग आपण सुध्दा आपली परिस्थिती नसताना सुद्धा प्रसंगी कर्ज काढून आपल्या मुलाला त्याच क्लासमध्ये दाखल करतो.कारण काय तर मराठी माणसाला इज्जतीची खुप काळजी अगदी पहिल्यापासून?
मग आम्ही सगळीकडे सांगत फिरणार माझ्या मुलगा त्या प्रसिद्ध क्लासला जातो.एकदाचा त्याला क्लासमध्ये टाकला की आपण आपली जबाबदारी झटकुन मोकळे !नितिन भानुगडे पाटिल साहेब म्हणतात की आपल्या मुलांना पहिल्यांदा हे शिकवा कि ,आपल्या मनामध्ये काय पीकत त्यापेक्षा बाजारात काय विकत यावर लक्ष्य केंद्रित करा.त्यांच्या छातिमध्ये सामर्थ्य भरा .कारण तो आयुष्यात पुढे येणाऱ्या आव्हानाला समर्थपणे तोंड देवु शकेल .
 आताच दिवालीमध्ये काही गोष्टी नजरेसमोर आल्या .आपल्या मराठी आया-बहिणी रस्त्यावर हार-फुले विकायला बसल्या होत्या.थोडस अप्रूपच वाटल.दिवसभर निरीक्षण केल तर बिनधास्तपने मराठी माणूस मुंबईच्या प्रत्येक रस्त्यावर हार -फुले विकत बसलेला होता.आणि हे पाहून माझी कॉलर टाइट झाली
नवरात्री,दीपावली या दिवशी बिनधास्तपणे धंदा करण्यासाठी उतरणारा हाच मराठी मानुस बाकीच्या दिवशी कुठे गडप होतो?दूसरा धंदा भेटत नाही मराठी माणसाला? की आपण करण्याचे कष्ट उपसत नाही ?
आपला वडापाव काय तर म्हणे शिव-वडापाव !
अगदी राजधानिपर्यंत वडापाव पोचवला.
चालला किती दिवस ?काही मोजके अपवाद वगळता याच वडापावच्या गाड्या धुळखात आपण भंगारात कधी जाणार याची वाट पाहत उभ्या असतात .किमान त्या दिलेल्या नावाच तरी पावित्र्य राखा .हे सर्व बघुन कीव वाटते की मी सुद्धा एक मराठी मानुस आहे .
मराठी माणूस धंदा करायला गेला की एक विशिष्ट ओरड ऐकायला मिळते की आमच्याकडे अमराठी सोडा मराठी माणूस पण फिरकत सुद्धा नाही.अरे कसा येईल तो तुमच्याकडे ?आपल्याला बनवायला काय येत वडापाव :अर्धवट तळलेला ,आतील भाजी कच्ची ,त्यात वरुण अळणी .....समोसा तर आपल्या उभ्या पिढ्यांना जमलेलाच नाही .ती कल्पना न केलेलीच बरी ! संध्याकाळच्या वेळेला चाळीमधून हमखास ऐकायला येणार हे वाक्य आहे.आई आपल्या मुलाला सांगत असते की जा बाळा दोन समोसे घेवून ये .मुलगा विचारतो आई कुठून आणु ?त्यावर आई उत्तरते आपल्या नाक्यावरती तो मराठी वडापाववाला आहे ना त्याच्या बाजूला जैन स्वीट मार्ट आहे तिथून घेवून ये .ही आपल्या मराठी माणसाची लाजवाब ओळख ?
आपल्या बाजूला धंदा करणाऱ्या जैनांच स्वीट मार्ट कधी झाल हे आपल्यालाच कळत नाही.आणि आपण आपली गाडी कधी खराब होतेय ,आपल्या कर्जाचे हफ्ते कधी ऐकदाचे संपत आहेत हे पाहत असतो .
आपण आपल्या पदार्थांचा दर्जा कधी सुधारणार ?अनेक मराठी माणस बघितली सगळ्यांना अभिमानाने सांगत असतात माझा मुलगा हॉटेल मॅनेजमेंटला आहे.मुलगा 6 महीने झाले की घरी पळून येतो .किंवा शिकलाच तर साध्या हॉटेल मध्ये नोकरी करतो .असं का?आपण आपल्या मुलांच्या पंखामध्ये बळ भरणार नाही तर कोण भरणार ?इथेही आपली संकुचित मानसिकता आड येते. मुलगा साधारण वयात आला की वडील त्याला उपदेश करतात की ,बाळा आता शिक्षण पुरे झाले बहिणीच लग्न करावयाच आहे !तूझपण लग्नाच वय झाल आता ...म्हणजे खर तर यांना आपल्या जबाबदारितुन मोकळे व्हायचे असते.पण त्यांना याची जाणीव नसते की आपण आपल्या मुलांच्या भविष्यावरच घाला घालत आहोत .ही मानसिकता काय कामाची ?

××××××××××भाग 1 ×××××××××××××WWW.MAHAKATTA.COM

रविवार, ७ डिसेंबर, २०१४

राजा शिवछत्रपती ...


निश्र्चयाचा महामेरू, बहुतजनांसी आधारू, अखंडस्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी ।।
नरपती, हयपती, गजपती। गडपती, भूपती, जळपती।
पुरंदर आणि शक्ति पृष्ठभागी।।
यशवंत, कीर्तीवंत, सामर्थ्यवंत।
वरदवंत, पुण्यवंत, नीतीवंत। जाणता राजा ।।
आचरशील, विचारशील, दानशील।
धर्मशील सर्वज्ञपणे सुशील। सकळाठाई ।।
धीर उदार गंभीर। शूर क्रियेसी तत्पर ।
सावधपणे नृपवर तुच्छ केले।।
देवधर्म गोब्राह्मण, करावया संरक्षण।।
हृदयस्थ झाला नारायण, प्रेरणा केली
या भूमंडळाचे ठाई, धर्मरक्षी ऐसा नाही।
महाराष्ट्र धर्म राहिला काही, तुम्हा कारणी।।
कित्येक दृष्ट संहारली। कित्येकासी धाक सुटला ।
कित्येकाला आश्रयो जाहला ।
शिवकल्याण राजा। शिवकल्याण राजा।।शिवकल्याण राजा।।।