मंगळवार, १० मार्च, २०१५

शिवजयंती आणि सत्यनारायण पूजा .....

दि:8 मार्च 2015 तिथिनुसार शिवजयंती महाराष्ट्रामध्ये मोठ्या उत्साहात पार पडली. शिवसेना आणि शिवजयंती हे अविभाज्य समीकरण आहे.लोकमान्य टिळकांनी चालू केलेली शिवजयंती आणि गणेशउत्सव बाळासाहेब ठाकरे यांनी पुढे जपले आणि मराठी माणूससुद्धा त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला.मराठी माणूस जेथे जेथे गेला तिथे त्याने हे उत्सव साजरे केले.आणि आपल्या परंपरा चालिरिती यांची जपणूक केली.म्हणूनच आजही परदेशामध्ये आजही हे उत्सव मोठ्या दिमाखात साजरे केले जातात. हे बघितल्यावर आमची छाती गर्वाने आणि अभिमानाने भरून येते.असो . आज जरा एका वेगळ्याच विषयवार घसरतोय .समाजामध्ये वाढत चाललेली ब्राम्हणी पद्धत आणि पूजेअर्चेच माजलेल स्तोम यांना फटकारण खुप गरजेचे आहे .यासाठीच हा अट्टाहास. काल आमच्या विभागात सुद्धा शिवसेना आणि मनसेतर्फे शिवजयंती मोठ्या दिमाखात आणि उत्साहात साजरी केली गेली.याबद्दल प्रथम सर्वांच अभिनदंन करतो.आणि काय आपल्या विषयाला सुरुवात करुया. शिवजयंती आणि सत्यनारायण पूजा यांचा काडीमात्र संबंध आहे का ?महाराजानी स्वराज्यनिर्मितीसाठी सत्यनारायणाची पूजा केली होती काय ?हे माझ्या तर ऐकिवात नाही किंवा आजपर्यन्तच्या वाचनात नाही.कदाचित आपण विसरला असाल कि शिवरायांनी स्वराज्यस्थापनेची शपथ घेताना आपल्या स्वतःच्या रक्ताचा अभिषेक रायरेश्वरवार केला होता.मग काय हा दुर्दैवविलास ?त्यांच्याच जयंतीला आपण समोर त्यांचा फोटो ठेवून सत्यनारायणाची पूजा करत बसलो आहोत .हे बघुन त्यांना काय यातना झाल्या असतील याचा आपण कधी विचार केलाय ?रस्त्यावर शिवजयंतीचे काल मोठे मोठे फलक झळकत होते.पण राजे त्यात तुम्ही नजरेस येत न्हवता.पुढाऱ्यानी आपल मार्जिन कमी होतं म्हणून तुमचा फ़ोटोला एका कोपर्यात मोजूनमापुन बसवला होता.आणि त्याच्याखाली लिहिल होत प्रमुख कार्यक्रम :सत्यनारायणाची महापूजा.भाविकानी महाप्रसादाचा लाभ घ्यावा. राजे काल शिवजयंतीला उपस्थित राहून तुम्हाला अभिवादन करणारा तुमचा कट्टर मावळा मला कुठेच दिसत नहवता तो कुठेतरी हरवला होता.दिसत होता तो फ़क्त डीजेच्या तालावर नाचनारा आजचा तरुण आणि भगवा सदरा घालून गर्दीत मिरवणारा आजचा नेता राजे मला वाटल होत आजतरी मराठी माणूस एकत्र येईल पण त्याला तुमच्यासाठी वेळच भेटला नाही .राजे तुमच्या नावावर आजपर्यंत कितीतरी जण मोठे झाले आणि अजूनही होत राहतील याची आम्हाला खात्री आहे. राजे आज संभाजी राजांची महाराष्ट्राला खरी गरज आहे .ब्राम्हण लोकांनी आपल्या पोटाची खळगी भरण्यासाठी समाजामध्ये देवाच्या नावावर धंदा सुरु केला आहे.सत्यनारायण पूजेचा नविन धंदा त्यांनी निर्माण केला आहे.समाजातील निरक्षरता ,अंधश्रद्धा यांचा त्यांनी आपल्या स्वार्थसाठी उपयोग करुन घेतला आहे आणि आपल दुर्दैव म्हणजे साक्षर लोक सुद्धा या प्रकाराला बळी पडत आहेत. आजकाल राजे सत्यनारायणाची पूजा त्या फैशन-शो सारखी झाली आहे .गणपती बाप्पा आले कार्यक्रम काय तर सत्यनारायण पूजा आहे .टिळकांनी गणेश उत्सव का स्थापन केला? याचाच आम्हाला विसर पडलाय.त्यात कोणी दिडशहाणा भेटला आणि त्याला विचारल की का रे बाबा सत्यनारायण पूजा तुम्ही का करता ?उत्तर अनपेक्षित अस नातेवाईक एकत्र येतात.मुलाच लग्न ठराव म्हणून ,घरात सुखशांती नांदावी म्हणून,शेजारयांनी केली म्हणून अशी अनेक उत्तरे ऐकून मीच खजील झालो.हल्ली तर लग्न झाल की हमखास सत्यनारायण पूजा असनारच.महाराष्ट्रातील मराठी माणसाच्या कुठल्याही लग्नाची पत्रिका उघडून पहा.पूजेचा रकाना असल्याशिवाय राहणार नाही.अहो लग्न ठरवायच्या अगोदर पूजा कधी घालायची यावरून वधु-वर पक्षात वाद सुरु असतात .ही आजची वस्तुस्तिथी आहे. नवरात्र उत्सव आला कार्यक्रम काय? सत्यनारायण महापूजा एकीकडे आपण दुर्गादेवीची पूजा करतोय आणि दुसरीकडे सत्यनारायण महाराज .पाया पडायला येणारी लोक कोणत्या देवाच्या पाया पडू या संभ्रमात असतात.आणि मग ते सत्यनारायणाच्या पाया पडतात आणि मोकळे होतात. किरण भालेकर