बुधवार, १८ फेब्रुवारी, २०१५

रतनगड ट्रैक स्टोरी भाग 2 -टाइगर ट्रैकर्स

प्रत्येकाचे चेहरे बघन्यासारखे झाले होते.त्यांच्यात स्फूर्ती आणण्याची गरज होती. आमच्याजवळील माइक सिस्टीम बाहेर काढली आणि शिवछत्रपतींच्या आणि आई भवानीच्या जयघोषाने अवघे जंगल दुमदुमुन गेले.फक्त 6 जणांचा आवाज पण ऐकणाऱ्याला वाटाव कि 50000 हजाराची फौज गडावर चाल करुन येत आहे.मित्रांमध्ये स्फूर्ती आली आणि पुन्हा नव्या दम्याने आणि जोशाने रतनगड जवळ करू लागलो.बरोबर तीन तासाने आमच पहिल टार्गेट पहिली शिडी गाठली.रतनगडच्या या शिड्या उभ्या कड्याला भिडलेल्या आहेत.आणि काळाने खुप गंजलेल्या अवस्थेत आहेत.नजर वर करुन पहिल तरी दरदरून घाम सुटावा.एकावेळी एकच माणूस शिडीवरुन जाऊ शकतो.या शिडीवरुन तोल गेलाच तर मृत्युला खुल आमंत्रण दिल्यासारखे आहे.शिवछत्रपतींचा जयघोष आसमंतात दुमदुमत होता.या शिड्या अंदाजे 4000 किंवा त्यापेक्षा अधिक उंचीवर आहेत.वरुन खाली बघितल आणि आम्हाला कल्पना आली कि आम्ही किती मोठ शिखर सर केले आहे.अशा 6 आडव्या -उभ्या शिड्या पार केल्यावर दरवाजा लागतो.दरवाजा आजही उत्तम स्तिथीमध्ये आहे.दरवाज्यावरील शिल्पकामही अप्रतिम आहे.दरवाज्यातून आत गेल्यावर डाव्या हाताला एक प्रचंड कडा लागतो. जायला एक निमुळती वाट आहे आता शासनाने तेथे तटबंदी उभारली आहे.ईथे दोन गुहा आहेत 1) रत्नादेवीची गुहा 2)अंधारी गुहा रत्नादेवीच्या गुहेमध्ये 6 जणांचा ग्रुप आरामात राहु शकतो.तर मोठ्या गुहेमध्ये 20 ते 25 जण आरामात राहु शकतात.रत्नादेवीची गुहा ही आतून अतिशय उबदार ,स्वच्छ प्रकाशाची आणि सुरक्षित आहे.सकाळी लवकर गेल्यामुळे आम्हाला रत्नादेवीची गुहा रहायला मिळाली.गुहेमध्ये रत्नादेवीची अतिशय प्राचीन मूर्ती आहे आणि गणपती बाप्पाची सुद्धा प्राचीन मूर्ती आहे.रत्नादेवीची आम्ही सर्वानी विधिवत पूजा केली.आता आपल्याला कळले असेल की रत्नादेवीच्या नावावरूनच गडाला रतनगड असे नाव पडले. गडावर पोहोचल्यावर आम्ही एनर्जीसाठी लिंबु सरबताचा बेत आखला होता पण रतनवाडीला लिंबु मिळालच नाही साखर तेवढी बरोबर होती.साखरेचे गोड पाणी आम्ही प्यायलो.पण ते गोड पाणी प्रचंड थंडगार आणि मधुर लागत होत.गडावर थंडगार पाण्याची दोन तळी आहेत आणि त्यामध्ये मुबलक पाणी बारमाही असते.त्याबरोबरच भेळ बनवली होती.थोडस पोटात गेल्यामुळे बर वाटत होते.विश्रांती केल्यानंतर आम्ही गड फिरण्यासाठी बाहेर पडलो.फोटोग्राफी साठी जनुकाही रतनगडावरील आकाशाला गवसणी घालणारी उंचच उंच शिखरे आम्हाला साद घालत होती.रत्नादेवीच्या गुहेच्या समोर डाव्या हाताला आकाशाला भिडलेला एक प्रचंड सुळका दिसतो तेथील गावकरी यांच्या मते त्या सुळक्यावर शिवपिंडी आहे व तिथून सतत पाण्याची धार चालु असते.कावेरी नदीच उगमस्थान तेथे आहे याबद्दल गावकर्यांच्या मनात संभ्रम आहे. रतनगडावरील वातावरण अतिशय आल्हाददायक आहे.आयुष्यात इतकी शांतता प्रथमच अनुभवत होतो.मन अगदी निरभ्र होऊन गेले होते.तेव्हाच मनाशी ठरवले की आयुष्यात पुन्हा कधीतरी नक्कीच या ठिकाणी येईन.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा