शुक्रवार, २१ जुलै, २०१७

भटकंती किल्ले टकमकची....

सफर सह्याद्री ट्रेकर्स खास आपल्यासाठी एक दिवसीय किल्ले टकमक ट्रेक आयोजित करत आहे.पावसात भिजत,निसर्गाचा मनमुराद आस्वाद घेत हा ट्रेक आपण पार करणार आहोत.तेव्हा अगत्य असू घ्यावे..

महाराष्ट्राची हेरगिरी...

शिवाजी राजे आणि बहिर्जी नाईक यांच्या विचारावर उभी आहे इस्राईल गुप्तहेर संघटना 'मोसाद

*"महाराष्ट्राची हेरगिरी..!!!"*

जगातील दुस-या क्रमांकाचा पुरातन व्यवसाय म्हणजे 'हेरगिरी'
जवळपास सर्वच देशांकडे आज त्यांच्या गुप्तचर संघटना अथवा संस्था आहेत आणि त्याबद्दल लोकांना कुतूहल, आदर, दरारा, भीती, तिरस्कार अशा विविध भावना असतात.

गुप्तचर अथवा हेर हे अगदी पुरातन काळापासून अस्तित्वात आहेत. आर्य चाणक्यांच्या 'अर्थशास्त्र' मध्ये गुप्तहेरांचा उल्लेख सापडतो. याबाबत विस्तृत विवेचन चाणक्यांनी करून ठेवलेले आहे.
*छत्रपती शिवाजी महाराजांचा 'गनिमी कावा' यशस्वी होण्यामागे 'बहिर्जी नाईक' यांच्यासारख्या हुशार-चलाख हेरांचा सहभाग मोठा आहे.*

अमेरिका, रशिया आणि इस्राईल या देशांच्या सीआयए, केजीबी, मोसाद या गुप्तचर संस्थांचा जगभरात विशेष दबदबा आहे.

'बाजीराव जाधव' महाराष्ट्राच्या सांगली जिल्ह्यातील पलूस गावचे, वयाच्या सोळाव्या वर्षीच भारतीय सैन्यदलात नोकरी स्वीकारून देशसेवेचे अखंड व्रत अव्याहतपणे जपणारे. सन १९९९ च्या कारगिलच्या लढाईत आपल्या सार्थ पराक्रमामुळे भारत सरकारने त्यांना 'शौर्य पदक' देऊन वरिष्ठ पदावर नेमणूक केलेली.
चौकस बुद्धी, विशेष धाडस, शौर्य यांच्या जीवावर बाजीराव हिंदुस्थानी गुप्तहेर खाते "रॉ" (RAW) मध्ये रुजू झाले.

"रॉ" : RAW-Reasearch & Analysis Wing, हिंदुस्थानी गुप्तहेर संघटना, ज्याची स्थापना, सन १९६२ (भारत-चीन) आणि सन १९६५ (भारत-पाकिस्थान) च्या युद्धा नंतर सैन्याची कामगिरी आणखी प्रबळ करण्याकरिता 'श्री. रामेश्वरनाथ काव' यांच्या नेतृत्वाखाली सप्टेंबर, १९६८ मध्ये करण्यात आली. म्हणजेच भारताच्या स्वातंत्र्यानंतर जवळ-जवळ २० वर्षांनंतर..!

अमेरिकेत.., 'जागतिक सुरक्षा परिषद' संपवून बाजीराव गाडीमधून विमानतळाकडे रवाना होत असताना, एका सुंदर परदेशी मुलीने त्यांना थांबविले.
तिला समोर पहाताच बाजीराव आनंदित झाले...,
बाजीरावांनी स्मित वदनाने त्यांना अभिवादन केले.

'नमस्ते..!

.....*जगातील सर्वात खतरनाक गुप्तहेर खात्याची उच्च अधिकारी 'साराह' बाजीरावांसमोर मोठया प्रसन्न चेह-याने दोन्ही हात जोडून उभी होती...!*

बाजीरावांचा तो भारतीय स्नेह स्वीकारत ती उत्तरली..

'नमस्ते..!!
'अरे, मी इथे गुप्तहेर म्हणून नव्हे तर माझ्या देशाची प्रतिनिधी म्हणून आले आहे. तुला पाहिले आणि राहवले नाही.. आणि तुला भेटायला आले.'

साराह आणि बाजीराव हे काही वर्षांपूर्वी इस्राईल येथे भेटले होते.

*साराह ही इस्राईल गुप्तहेर संघटना 'मोसाद' ची एक तरुण, तडफदार आणि तितकीच निडर अधिकारी आहे.*

*'मोसाद'... एक अशी गुप्तहेर संघटना, जिच्या हिटलिस्टवर जर एखाद्याचे नाव चढले तर प्रत्यक्ष देवसुद्धा त्याला वाचवू शकत नाही, असा दरारा...!!*

इस्राईल सारख्या तुटपुंज्या देशाची ही छोटीशी संघटना असामान्य कर्तृत्व, जगातील सर्वोत्तम, सर्वोत्कृष्ट गुप्तहेर संघटना कोणती, तर डोळे झाकून उत्तर येते 'मोसाद'.

'मोसाद' चा अर्थ साक्षात मृत्यू...! आपल्या देशाच्या शत्रूला शोधून, त्याला आपल्या देशात गुप्तपणे आणून त्याला शिक्षा देते. शिक्षा दिल्यानंतर सर्व जगाला कळते, की अमुक-अमुक व्यक्तीला शिक्षा दिली गेली. इतकी खतरनाक संघटना.

मोसादचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे 'कमालीची गुप्तता', याच गुप्ततेमुळे मोसादमध्ये दुस-या कुठल्याही गुप्तचर संघटनेला आपला हेर घुसवणं जमलेलं नाही, पण याच मोसादनं जगातील सर्वच गुप्तचर संघटनेमध्ये आपले हस्तक घुसवलेले आहेत. त्यामागचा हेतू एकच-माहिती मिळवणं.

*अशा गुप्तहेर संघटनेत दहा दिवसांच्या प्रशिक्षणासाठी बाजीराव इस्राईलला गेले होते, तेंव्हा सारहाची भेट झाली होती. तिच्याकडून खूप काही शिकून घेतले होते.*

आज इतक्या वर्षांनंतर सारहाने बाजीरावांना ओळखले.
विमानाला अजून २/३ तास अवकाश होता म्हणून दोघेही कॉफीशॉप मध्ये बोलत बसले.

'सारहा, तू इतक्या वर्षांनंतरही मला अचूक कसे काय ओळखलेस..?'
मला वाटले, ज्यांना सारे जग घाबरते अशा संघटनेची एक वरिष्ठ अधिकारी स्वतःच्याच अभिमानात(तो-यात) असेल; पण तू तर मला अजूनही लक्षात ठेवलेस..! It's really surprising...!!

किंचित स्मित हास्य करीत सारहा म्हणाली,

'अरे, असे नको बोलूस.., *आम्ही जगात सर्वांना विसरू, पण भारतीय लोकांना कधीच नाही.*

एक परदेशी मुलगी, आणि ती ही एका महाभयंकर अशा गुप्तहेर खात्याची अधिकारी...!! आपल्या भारताबद्दल तिच्या प्रति असलेले प्रेम-आस्था पाहून डोळे भरून आले.

सारहा पुढे बोलत होती;
'अरे, हे काहीच नाही. जरी आम्ही जगात सर्व श्रेष्ठ असलो तरी आमच्या गुप्तहेर खात्याचा आत्मा-शिकवण ही मूळची भारताचीच आहे, *आम्हाला तुमचा इतिहास, तुझ्या महाराष्ट्राचा इतिहास अगदी कोळून शिकवला जातो.

*आम्हाला शिवाजी राजे शिकवले जातात आणि सर्वात महत्वाचे म्हणजे आमच्या गुप्तहेर प्रणालीचा आत्मा आहे... बहिर्जी नाईक...!*

'बहिर्जी नाईक', नाव ऐकताच बाजीरावांच्या डोक्यात झिणझिण्या आल्या, अंगावरून सरसरून काटा आला.... डोळ्यांत अश्रू आपसूक तरळले.

बाजींकडे पहात सारहा म्हणाली,

'तुझ्या डोळ्यांत पाणी..? माझं काही चुकलं का...?'

नकारार्थी मान हलवत बाजीरावांनी डोळे पुसले आणि बोलू लागले,

*'नाही सारहा, तू ज्यांचे नाव घेतलेस त्या बहिर्जी नाईकांना, त्यांच्याच महाराष्ट्रात लहानाचा मोठा झालो तरी समजू शकलो नाही, मीच नाही माझ्या सारखे कित्येक आहेत ज्यांना बहिर्जी नाईक सोड पण आमचे राजे 'छत्रपती शिवाजी महाराजही' नीटसे माहिती नाहीत.*
आज त्यांचे नाव तुझ्या सारख्या विद्वान-निडर मुलीच्या तोंडून ऐकून मी पुरता खजील झालो आहे.

बाजीरावांचे ते बोलणे ऐकताच सारहा म्हणाली;
'अरे, तुम्ही खूप भाग्यवान आहात, आमची काम करण्याची पद्धत तुमच्या शिवाजी राजांसारखी अन् बहिर्जी नाईकांसारखीच आहे. आमच्या हर एक अधिका-यांच्या तोंडी तुमच्या शिवाजी राजांचा आणि बहिर्जी नाईकांचा सर्व इतिहास तोंडपाठ आहे, आणि तो आम्हाला ठेवावाच लागतो, तसेच आम्हाला शिकवले जाते. आमची training च तशी आहे.

सारहा बोलत होती आणि बाजीराव ऐकत होते.

बाजीराव सारहाचा निरोप घेऊन विमानात बसले, प्रवासात.., डोक्यात फक्त अन् फक्त एकच विचार..,शिवाजी राजे आणि बहिर्जी नाईक.

'किती मूर्ख आहोत आपण भारतीय, सा-या जगाला घाबरून सोडणारी 'मोसाद' ही मराठयांचा दैदीप्यमान इतिहास अभ्यासून मार्ग ठरवते आणि आम्ही रक्ताचे मराठे आज तुटपुंज्या देशाचा दहशतवाद गेली पन्नास वर्षे निमूटपणे सहन करतोय, आजही आमचे जवान हकनाक बळी जातायेत. बाजीरावांच्या डोक्यात विचारांचा डोंब उसळला होता.
आता त्यांना एकच ध्यास लागला होता शिवाजी राजांचा - या महाराष्ट्राचा बहिर्जी नाईक समजून घेण्याचा.

सह्याद्री मित्र....

नमस्कार,

तुम्ही एखाद्या निसर्गरम्य ठिकाणी गेला आहात; तिथे जर तुम्हाला प्लँस्टिकच्या बाटल्यांचा किंवा रॅपरचा खच दिसला तर कसं वाटतं... तुम्ही ओढ्याच्या खळाळत्या पाण्याचा किंवा एखाद्या पक्ष्याचा आवाज ऐकण्यात गुंग असताना कुणी स्पीकरवर गाणी ऐकत बाजूने गेलं तर?... तुम्ही माकडाला खाऊ देत असताना, माकडाने सोबतच्या लहान मुलाच्या हातातील पदार्थावर झडप घातली आणि चुकून चावा घेतला किंवा ओरबाडलं तर??... या जर-तर च्या गोष्टी असल्या तरी घडणार नाहीत याची काहीच शाश्वती नाही. त्यामुऴेच सह्याद्रीच्या दऱ्या-खोऱ्यांत फिरताना काय करावे किंवा करू नये, यासाठी अनेक वर्षे सह्याद्रीत भटकणाऱ्या सह्याद्री मित्रांनी 'रिस्पॉन्सिबल टुरिझम'ची म्हणजेच 'जबाबदारीने करावयाचे पर्यटन' ही संकल्पना राबवली आहे. सह्याद्रीत किंवा इतर कोठेही फिरताना कोणत्या गोष्टीं कराव्यात अथवा करू नये, हे विविध माध्यमांतून सांगण्याचा प्रयत्न 'सह्याद्री मित्र' करणार आहेत. तरी, आपल्यापर्यंत पोहोचलेला हा संदेश इतरांनाही फाँरवर्ड करून निसर्गसंवर्धनाच्या या कामी हातभार लावावा
.
आपले - सह्याद्री मित्र
www.sahyadri.netगुरुवार, ४ मे, २०१७

वाढदिवस

देवांनाही अभिमान वाटावा अशी ही आपली महाराष्ट्र पुण्यभूमी, संतांची भूमी, साक्षात हिमालयाला हि आपला हेवा वाटावा असा आपला पाठीराखा रांगडा सह्याद्री, अन साऱ्या जगाला दिपवून टाकणारा अतुलनीय इतिहास ज्या मातीत घडला, त्याच पुण्यभूमीत आपला जन्म झाला, हि खूप मोठी भाग्याची गोष्ट आपल्यासाठी आणि आपल्या कुटुंबासाठी....
आज आपला जन्मदिन, आपल्या जीवनातील प्रत्येक दिवस आपला असा असावा कि समाजातील प्रत्येक व्यक्तिला आपला हेवा वाटावा....
आपल्या जिवनात कधीच दुःखाची सर नसावी, प्रत्येक क्षणी सुखानेच भरलेली आपली ओंजळ असावी....

ईश्वरा: त्वाम च् सदा रक्षतु
पुण्य कर्मणा किर्तीमार्जय
जीवनम् तव भवतु सार्थकम्
इति सर्वदा मुदम् प्रार्थयामहे
दिर्घायुरारोग्यमस्तु
सुयश: भवतु
विजय: भवतु
जन्मदिन शुभेच्छा...
                               किरण प्रकाश भालेकर
                         Bhalekar 117.blogspot.com
                         Bhalekar 117.wordpress.com
                         Facebook.com/bhalekar117

शनिवार, २५ मार्च, २०१७

आम्ही सह्यवेडे,दुर्गवेडे

भव्य हिमालय तुमचा अमुचा केवळ माझा सह्यकडा
गौरीशंकर उभ्या जगाचा, मनांत पूजीन रायगडा
तुमच्या अमुच्या गंगा यमुना केवळ माझी भिंवरथडी
प्यार मला हे कभिन्न कातळ, प्यार मला छाती निधडी
मधुगुंजन लखलाभ तुम्हांला, बोल रांगडा प्यार मला
ख्रिस्त बुद्ध विश्वाचे शास्ते तुकयाचा आधार मला
धिक तुमचे स्वर्गही साती
इथली चुंबीन मी माती
या मातीचे कण लोहाचे, त्रुणपात्यांना खड्गकळा
कृष्णेच्या पाण्यातून अजुनी वाहतसे लाव्हा सगळा

कबीर माझा, तुलसी माझा, ज्ञानेश्वर परी माझाच
जयदेवाचा जय बोला परी माझा नाम्याचा नाच
जनीं जनार्दन बघणारा तो "एका" हृदयी एकवटे
जनाबाईच्या ओवीमध्ये माझी मजला खूण पटे
इंद्रायणीच्या डोहामधली गाथा ओली ती ओली
ती माझी मी तिचाच ऐसी; जवळीक कायमची झाली
भक्तीचा मेळा दाटे
चोख्याची पैरण फाटे
निर्गुण मानवतेची पूजा करणारे करू देत भले
माझ्यासाठी भीमाकांठी भावभक्तीची पेठ खुले

रामायण तर तुमचें अमुचे भारत भारतवर्षाचें
छत्रपतींची वीरकहाणी निधान माझ्या हर्षाचें
रजपुतांची विक्रमगाथा तुमच्यापरी मजला रुचते
हृदयाच्या हृदयांत; परंतू बाजी बाजीची सुचते
अभिमन्युचा अवतारच तो होता माझा जनकोजी
दत्ताजीचा शेवटचा तो शब्द अजुन हृदयामाजीं
बच जाये तो और लढे
पाउल राहील सदा पुढे
तुम्हास तुमचें रुसवेफुगवे घ्या सगळा नाजुक नखरा
माझ्यासाठी; राहील गांठी; मराठ्यांचा हट्ट खरा

तुमचेंमाझें ख्यालतराणे दोघेही ऐकू गझला
होनाजीची सोनलावणी वेड लावते; परी मजला
मृदुंग मोठा सुमधुर बोले, मंजुळ वीणा अन मुरली
थाप डफावर कडकडतां परी बाही माझी फुरफुरली
कडाडणारा बोल खडा जो दरी-दरीमधुनी घुमला
उघडुनी माझ्या हृदयकवाडा तोच पवाडा दुमदुमला
तटातटा तुटती बंद
भिंवईवर चढते धुंद
औट हात देहांत अचानक वादळ घुसमटुनी जातें
उचंबळे हृदयात पुन्हा तें इतिहासशी दृढ नातें

कळे मला काळाचे पाउल द्रुतवेगानें पुढती पडे
कळे मला क्षितिजाचे वर्तुळ क्षणोक्षणी अधिकची उघडे
दहा दिशांचे तट कोसळले, ध्रुव दोन्ही आले जवळी
मीही माझें बाहू पसरून अवघ्या विश्वातें कवळी
विशाल दारे माझ्या घरची, खुशाल हीं राहोत खुली
मज गरीबाची कांबळ वाकळ सकळांसाठी आंथरली
मात्र भाबडया हृदयांत
तेवत आहे जी ज्योत
ती विझवाया पहाल कोणी मुक्त करून झंझावात
कोटी कोटी छात्यांचा येथे कोट उभारू निमिषांत

होळी उत्सव -2017

https://youtu.be/yoBsdQnhBT8