बुधवार, २६ ऑगस्ट, २०१५

भटकंती 3


रायगड जिल्ह्यातील नागोठणे जवळील सुकेळी खिंडी जवळ खांब गाव नजिक सुरगड किल्ल्‌याला देखील भेट देण छान वाटेल. मुंबईहून महाडकडे जाताना याच सुकेळी खिंडीआधी एक रस्ता डाव्या बाजूस जातो आणि त्या रस्त्याने पुढे गेल्यास गाडी रस्ता संपतो आणि जंगलातील मळलेली पायवाट सुरु होते. याच पायवाटेने साधारण २० मिनिटानंतर एक उंच धबधबा दिसतो. त्या धबधब्याचे पडणारे पाणी आणि वाहणारी नदी हे एक अतिशय सुंदर आणि सुरक्षित ठिकाण आहे. रायगड जिल्ह्यात खोपोली पाली रस्त्यालगत दुरशेत गावाआधी उंबरखिंड हे एक ऐतिहासिक स्थान आहे. खंडाळ्याच्या डोंगरातून पडणारे पाणी उंबरखिंडीत येते आणि नदीमार्गे कोकणात जाते. पावसाळ्यात उंबरखिंडीत जाणे म्हणजे सर्वाना नक्कीच आवडेल. दुरशेतहून पुढे जांभूळपाड्यामार्गे भेलीव गावालगतचा मृगगड हा किल्ला आणि त्याकडे जाणारा नदीलगतचा मार्ग आपणास भुरळ पाडतो. गणपतीच्या पाली गावाआधी ठाणाळे हा लेणी समूह आणि त्याच्या आजूबाजूचा परिसर पावसाळ्य ात आपले वेगळे रूप दाखवतो. पाली गावालगतच सरसगड हा किल्ला आहे, आणि तेथून पुढे असणारा सुधागड किल्ल्याला देखील पावसाळ्य ात भेट देण मस्तच. रत्नागिरी जिल्ह्यातील देवरुखजवळील मार्लेेशरला पावसाळ्यात जाणे म्हणजे स्वर्गसुखच. तिन्ही बाजूनी उंच डोंगर त्या वरून वाहणारे हजारो छोटे मोठे धबधबे, एका बाजूला वाहणारी नदी, आणि म ह ा द े व ा च् य ा मंदिरामागे असणारा भला मोठा धुवाधार धबधबा काय वर्णावा…. … जबरदस्त…… िं स ध ु द ु ग र् ि ज ल् ह्य ा त ी ल आंबोलीत पावसाळ्य ात बरेच निसर्गप्रेमी, पर्यटक जातात. कारण आंबोली आहेच सुंदर. पण आंबोलीला जाऊन फक्त डोंगर – द-या, धबधबे न पाहता तेथे असलेल्या जैव विविधतेचा अभ्यास करण्यासाठी गेले पाहिजे. कारण या भागात अनेक दुर्मिळ पक्षी, फुले, साप, फुलपाखरे, चतुर, बेडूक, वनस्पती इत्यादी आढळतात. पावसामुळे संपूर्ण परिसर जिवंत होतो. जस माणूस लावणी, पेरणीच्या कामाला सुरुवात करतो त्याचप्रमाणे फुलझाडे, वनस्पती, प्राणी, पक्षी, बेडूक, साप, चतुर, फुलपाखरू, पतंग, छोटे-मोठे किडे इत्यादी अनेक सजीवांच्या जीवन चक्रातील हा महत्त्वाचा काळ असतो. प ा व स ा ळ् य ा त फिरण्यास बाहेर पडताना काही गोष्टी लक्षात ठेवाव्यात त्या म्हणजे चांगले शूज, पावसाळी जाकेट, छत्री, सुका खाऊ इ त् य ा द ी आपल्याबरोबर घ्यावेत. आपणास ज्या ठिकाणी जायचे आहे, त्या ठिकाणाची माहिती गोळा करावी आणि तिथे जायला यायला लागणारा वेळ लक्षात घ्यावा आणि त्याप्रमाणे आपल्या भटकंतीचे नियोजन करावे. खूप पाऊस असल्यास किंवा एखादा बाका प्रसंग घडल्यास कुठल्याही प्रकारचे डेरिंग न करता स्थानिक लोकांची किंवा पोलिसांची मदत घ्यावी. प्रत्येकाचा पावसाचा आनंद लुटण्याच्या संकल्पना वेगवेगळ्या असतात. काहीजण गड, किल्ले, ट्रेक्स, जंगल अशा ठिकाणी निसर्गाचा खरोखरीचा आनंद लुटायला जातात तर काही ठिकाणी सध्या पावसाळी भटकंती दरम्यान बरेच तळीराम दृष्टीस पडतात. एक तर अशा ठिकाणी जाण्याचे टाळावे आणि असे काही तळीराम भेटल्यास त्यांच्याशी हुज्जत घालू नये. प्रत्येकाने पावसाचा आनंद अशा वेगवेगळ्या ठिकाणांना भेट देऊन द्विगुणीत करायलाच हवा. चला तर मग.. पाऊस पडण्यास सुरुवात झाली आहे.. निसर्ग आपली वाट बघतोय.. साभार :गूगल संकलक:किरण भालेकर

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा