शुक्रवार, १३ एप्रिल, २०१८

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीनिमित्त विनम्र अभीवादन..

विश्वरत्न ,युगप्रवर्तक ,प्रज्ञासूर्य ,क्रांतिसुर्य, ज्ञानाचा अथांग सागर बोधिसत्व  डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांच्या 127 व्या जयंतीदिनी  त्यांना विनम्र अभिवादन .

ग्रंथ हेच गुरू..
शिका संघटित व्हा संघर्ष करा हे संदेश बाबासाहेबांनी आपल्याला दिले त्यांना फक्त एकाच जातीत कोंडण्याचे कटकारस्थान काही करंटे करत असतील तर निव्वळ मूर्खपणा आहे.या महापुरुषांनी जातीपातीला समाजकार्यात स्थान दिले नाही मग आपण त्यांच्यात भेदभाव करणारे कोण..?राज्यघटनेचा मसुदा तयार करण्याचे महत्वपूर्ण कार्य त्यांनी केले तसेच समाजातील गांजलेल्या गरीब जनतेसाठी त्यांनी संविधानात महत्वपूर्ण तरतुदी करून या बहुजन वर्गाला समाजात सर्वांच्या खांद्याला खांदा लावून काम करण्याचे बळ दिले.देशातील किंबहुना जगातील उच्चविद्याविभूषित म्हणून डॉ.बाबासाहेब आंबेडकर ओळखले जातात.यांच्या पदवीची लिस्ट वाचली तरी सामान्य माणूस चक्कर येऊन पडेल.☺ असा हा युगपुरुष आपल्या देशात होऊन गेला याचा आपल्याला सार्थ अभिमान पाहिजे.

आज त्यांची जयंती डीजेच्या तालावर,लाईटच्या झगमगाटात शक्तीप्रदर्शन करून साजरी केली जाते ते बघून वाईट वाटते.आज आपण सगळ्या महापुरुषांच्या जयंत्या याच पद्धतीने साजऱ्या करतोय,करू देतोय.या महान माणसांनी दिलेला वैचारिक वारसा तसाच मागे पडत चालला आहे.यासाठी जास्त काही करायची गरज नाही येणाऱ्या भावी पिढीच्या,लहानग्यांच्या मनामध्ये या महान माणसांनी केलेले कार्य,विचार ठसवले तरी आज आपण जे जातीपातीत मरतोय ते कमी होईल.एक सुदृढ समाज निर्माण होऊन देशाच्या प्रगतीला नक्कीच हातभार लागेल.नाहीतर मग कलाम सरांनी बघितलेले स्वप्न भारत महासत्ता बनेल ते फक्त स्वप्नच राहील..

किरण भालेकर
Bhalekar117.blogspot.com

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा