बुधवार, ६ मार्च, २०१९

किल्ले साटवली-लांजा राजापूर


स्वराज्य समुद्रावर वाढत असताना जलमार्गे मालाची ने-आण करण्याच्या दृष्टीने महत्त्वाची भूमिका बजावणारे व त्या काळात तालुक्यातील प्रमुख व्यापारी ठाणे म्हणून उदयास आलेले लांजा मार्गे लागणारे साटवली येथील ऐतिहासिक बंदर आणि गढी आहे .







छत्रपती शिवाजी महाराजांनी कोकणात मोहीम आखली त्या वेळी राजापूर ताब्यात घेऊन त्यांनी व्यापाराच्या दृष्टीने भरभराटीस आलेली लांजा तालुक्यातील साटवली गढी ताब्यात घेण्यासाठी एक सुभेदार सैन्यासह पाठवला. मराठी सैन्य गढी ताब्यात घेण्यासाठी येत असल्याचे कळताच मोगल सुभेदार आपल्या सैन्यासह जीव वाचवण्यासाठी महंमद वाडीच्या डोंगरावरून गुहेत लपून बसला. तो ज्या वाडीतून पळाला त्या वाडीला महंमदवाडी असे आज संबोधले जाते.

समुद्रा वरून नदीत पण उतरून हे इंग्रज एक दिवस जमिनीवर येऊन आपलं राज्य स्थापन करतील हे ठाऊक होतं महाराजांना .  मुचकुंदी नदी वर नियंत्रण ठेवून आपला व्यापार कोकणात होत असताना राजा साटवली गढी ची मदत घेऊन त्यात युद्धसामग्री व जीवनावश्यक वस्तू राखून ठेवून परकीय सत्ते बरोबर लढतो ह्यावरून मराठ्यांची समुद्री सत्ता किती बळकट असेल ह्याचा अंदाजा येतो .

बुरुज -

दुर्ग बांधणीत पहिले महत्वाचे अवयव म्हणजे भक्कम बुरुज . तटाला कमी जास्त अंतरावर आवश्यकते नुसार बुरुज बांधला जातो . तटाला लागूनच असणारी काही जागा तटाच्या जंग्यामधून होणाऱ्या माऱ्याच्या टप्यात येत नसे . ही जागाही माऱ्यात यावी म्हणून , तटापासून थोडे पुढे येतील अशा पद्धतीने बुरुज बांधला की त्यावर तोफांची सोय झाली तर लढाई जिंकताना तो बुरुज लढाईत सर्वात जास्त महत्वाचा ठरतो .








इतिहास:

साटवली किल्ल्यावरचा रस्ता जो लागतो त्याला लागून एक विठ्ठल रखुमाईचं पुरातन मंदिर आहे जे कुठल्या तरी सुरत च्या व्यापारीने बांधलं होतं ,त्या मंदिराजवळची ही तोफ. किंवा साटवली गढी सौरक्षणार्थ ही तोफ असावी.










एप्रिल १६७४ मुचकुंदीच्या खाडीत पूर्णगड किल्ल्या समोर आणि साटवली नावाच्या छोट्या कसब्याजवळ, सिद्दी संबूल आणि दौलतखान यांची दर्या गाजवणारी लढाई झाली. दोन्ही बाजूंनी पराक्रमाची शर्थ झाली. सिद्दी संबूल आणि दौलतखान जातीने आपल्या आरमाराचे नेतृत्व करत होते. एकमेकांवर बाणांचा वर्षाव करून दोन्ही आरमार हातात तलवारी घेऊन भिडले.
मराठ्यांची ४४ माणसे कामी आली. तर खुद्द दौलतखानाच्या पायाला बाण लागून तो जखमी झाला. पण सिद्दीचा दारूण पराभव झाला. सिद्दी कडील १०० माणसे मेली, तर सिद्दी संबूलच्याच गलबताला आग लागली. यात त्याचे दोन्ही हात भाजले.
संबूलने इथून जो पळ काढला तो थेट हरीहरेश्वरला पोहोचल्यावरचं थांबला. एकाप्रकारे दौलतखानाने महाराजांना राज्याभिषेकासाठी दिलेला नजराणाच हा. या लढाईमुळे मराठ्यांना राजापूर ते बारदेश हा पूर्ण तळकोंकण प्रांत, सिद्दीची चिंता न करता, जिंकता आला.
राज्याभिषेकाला त्रास देणे सोडाच, उलट सिद्दीने परत आलमगीरकडे कुमक पाठवण्याची केविलवाणी विनंती सुरु केली. आणि चक्क सप्टेंबर १६७५ पर्यंत, म्हणजे दीड वर्ष, कोणत्याही प्रकारे मराठ्यांच्या नादी लागला नाही.





लेखक व वर्णन :
अमित राणे यांच्या फेसबुकवरून माहितीसाठी साभार...

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा