शुक्रवार, २९ मे, २०१५

लेखणी बरसु लागते तेव्हा.....

बरेच दिवस झाले लेखणी शांतपणे एका कोपर्यात पहुडली होती.कदाचित तिची मला आठवण झाली नसावी.ही लेखणीच माझी खऱ्या अर्थाने सोबतीण आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.कुठेतरी व्यक्त होण्याची मी संधी पाहत असतो आणि ती मला यामधुन मिळते.प्रसंग लिखाण आणि टिकात्मक लिखाण यावरच माझा जास्त भर असतो. आज अचानक काही गोष्टी नजरेसमोर आल्या म्हणजे तश्या जुन्याच आहेत पण मला मात्र नवख्याच वाटु लागल्या.डोळ्यातली विझत आलेली आग पुन्हा धगधगुन पेटायला लागली.लिखाणातून परत एकदा बरसु लागली. महाभारतात अर्जुनाला सुद्धा स्वकीयांविरुद्ध शस्त्र उचलणे भाग पडले.इतकेच नव्हे तर छत्रपती शिवाजी महाराजांना आपले भाऊ व्यंकोजी राजे यांच्याविरुद्ध शस्त्र उगारावे लागले होते.आणि महाराजांचा हाच आदर्श प्रमाण मानून आपल्याच स्वजनांविरुद्ध लेखणी चालविताना आमचे हात डगमगणार नाहीत याची आम्ही काळजी घेऊ. महाराष्ट्र या शब्दाचा अर्थ म्हणजे महा+राष्ट्र=महाराष्ट्र होय.महा म्हणजेच मराठा आणि या मराठयांचे राष्ट्र म्हणजेच महाराष्ट्र होय.तर अशा या महाराष्ट्रात अनेक ऐतिहासिक, शिवकालीन मराठी घराणी आजही वास्तव्यास आहेत.यातीलच काही मराठा घराण्यानी वतनाच्या ,सत्तेच्या लोभापायी वर्षानुवर्ष सुलतानांची चाकरी करण्यातच धन्यता मानली.सुलतानांच्या दरबारातले मातब्बर सरदार म्हणून हेच मराठे नावारूपास आले.त्यांची आता नावे घेत नाही सुजाण वाचकांस ते ठावुक असेल यात तिळमात्र शंका नाही. यातीलच काहीजण आजही सुलतानांनी दिलेली वतने ,किताब लाखमोलाने मिरवत आहेत.जनतेची दिशाभूल करत आहेत .त्यांना उसने अवसान आणून सांगत आहेत कि आम्ही इतिहासात अशी कामगिरी केली.आपल्या नावापुढे खुशाल राजे लावण्यात यांना अभिमान वाटतो.आम्ही या प्रांताचे राजे,त्या प्रांताचे खोत,कोकणचे राजे ...... काहीजण तर सुलतानराव असे किताब मिरवत आहेत.या लोकांना लाज तरी कशी वाटत नाही?ज्यांच्या नावातच अर्थ दडलेला आहे तोसुद्धा या मुर्खाना कळत नाही.सुलतान सम्राटांनी दिलेले किताब कोणते आणि महाराजांनी केलेले गौरव कोणते?हे कळन्याइतपत आम्ही मुर्ख नाही.त्यामुळे अशा लोकांनी आमच्यापासून दोन हात लांब राहणेच त्यांच्यासाठी सोईस्कर जाईल. याच मराठ्यानी शिवाजी महाराजांना स्वराज्यस्थापनेसाठी मदत केली असती तर आजचा इतिहास काहीतरी वेगळा असू शकला असता.फितुरी ,गृहकलह याचा मराठयांना पिढ्यानपिढ्या शाप आहे.इंग्रजांनी याचाच फायदा घेतला .तोडा,फोडा आणि राज्य करा या नितिचा वापर करुन देशाची विभागणी करुन ते निघुन गेले आणि जाता जाता भांडण लावून गेले.आजही त्याचे परिणाम आपण भोगत आहोत. आताही आमच्यामध्ये एकी निर्माण झालेली नाही.एकमेंका सहाय्य करू अवघे धरु सुपंथ.या वचनाचा आम्हाला विसर पडला आहे.आपलेच भाऊबंद वरच्या पायरीवर जात असतील तर आपण त्यांना तळाची पायरी दाखवून आसुरी आनंद साजरा करत आहोत.इतिहासात पण आपण हेच करत आलो आहोत आणि आताही परिस्तिथी काही वेगळी नाही . काय करू शब्द खुप आहेत पण लिहिन्याची इच्छा नाही. Bhalekar117.blogspot.com किरण भालेकर

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा