माझ्या या ब्लॉग मधे आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे .मी एक पक्का मराठी माणूस आहे त्यामुळे साहजिकच मराठी माणसाबद्दल माझ्या मनात असीम आत्मीयता आहे.मला ट्रेकिंगची प्रचंड आवड आहे .आणि आतापर्यंत काही मोठे ट्रैक सुदधा केले आहेत. सह्याद्री आणि मी घनिष्ठ मित्र आहोत असे मला वाटते.माझे आदर्श,माझे दैवत छत्रपती शिवराय यांचे कार्य पुढील पिढीसमोर ठेवणे हे माझे प्रथम काम आहे .या ब्लॉगमधे सह्याद्री,गडकिल्ले कोकण,माझे ट्रेकिंगचे अनुभव,मराठी माणूस यांवर प्रामुख्याने बोलणार आहे.
शुक्रवार, १२ जून, २०१५
गणपतीपुळे _गणेश मंदिर
रत्नागिरी जिल्ह्यावर परमेश्वराचा वरदहस्त आहे. गणपतीपुळे, पावस, आडिवरे, मार्लेश्वर, कसबा, अशी अनेक तीर्थक्षेत्रे रत्नागिरी जिल्ह्यात आहेत. सा-या बाजूंनी रत्नागिरी जिल्हा समृद्ध आहे. अगदी तिथल्या माणसांपासून ते निसर्गापर्यंत सारं काही आपलंसं करणारे आहे. कोकणातली माणसं तर त्यांच्या अगत्यासाठी प्रसिद्ध आहेतच, पण निसर्गाच्या कुशीत वसलेलं कोकणदेखील आपल्याला कायमच खुणावत असतं.
गणपतीपुळे हे रत्नागिरी जिल्ह्यातील प्रसिद्ध पर्यटनस्थळ आहे. स्वयंभू गणेशाचे हे स्थान अतिशय नयनरम्य व मनाला शांतता देणारे आहे. ह्या मंदिराचे वैशिष्ट्यअसे की हे मंदिर समुद्रकिनारी आहे. किनारा आणि मंदिर यातील अंतर फार तर फार पाच मिनिटे असेल. मंदिरातून बाहेर पडल्यावर लगेच आपण किना-यावरच उतरतो. एका बाजूला समुद्र म्हणजे वाळू तर दुस-या बाजूला खडकाळ प्रदेश असे हे अनोखे आहे, अशा प्रतिकूल परिस्थितीत देखील बाप्पाला आवडणा-या दुर्वा मात्र तिथे विपुल प्रमाणात उपलब्ध आहेत.
येथील ४०० वर्षांची गणपतीची मूर्ती स्वयंभू आहे. सह्याद्री पर्वतातील नैसर्गिक मूर्ती आणि त्याच्या पश्चिमेला अरबी समुद्र ह्यामुळे हे देऊळ आगळे आहे. गणपतीची मूर्ती स्वयंभू असल्याने त्याला प्रदक्षिणा घालण्यासाठी संपूर्ण डोंगराला प्रदक्षिणा घालणे क्रमप्राप्त असते. १ कि. मी. लांबीचा हा प्रदक्षिणामार्ग समुद्र, वाळूचा किनारा आणि नारळ पोफळीच्या झाडांमुळे अतिशय विलोभनीय दिसतो. देवळासमोरील स्वच्छ सुंदर समुद्रकिनारा मनमोहक आहे.
राहण्यासाठी खोल्या :
गणपतीपुळे यथे महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळ (M.T.D.C.) चे विश्रामगृह आहे. त्याशिवाय देवळातील भटजींच्या घरीसुद्धा राहण्याची सोय होऊ शकते.
कसे जावे :
मुंबई गोवा महामार्गावर निवली पासून एक रस्ता आहे .रत्नागिरी शहरापासून नेवरे -कोतवडे मार्गे गणपतीपुळे जाण्यासाठी देखील सहज शक्य आहे .गणपतीपुळे देखील मालगुंड पासून जयगड रोड , वरवडे बाजूला जोडलेले आहे .
विमान:
जवळचे विमानतळ बेळगाव , 299 किमी आहे.
रेल्वे :
तसेच रेल्वेने देखील पर्यटक रत्नागिरीला उतरून गणपतीपुळ्याला जाऊ शकतात.
बस:
गणपतीपुळे रत्नागिरीपासून सुमारे ४० कि. मी. लांब आहे. महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ (S.T.) मुंबई, पुणे, कोल्हापूर, नाशिक इत्यादी शहरांपासून गणपतीपुळे येथे थेट बससेवा पुरवते.
जवळपास पाहण्यासाठी ठिकाणे:
गणपतीपुळे समुद्रकिनारा , मालगुंड , पावस , मार्लेश्वर मंदिर आणि धबधबा , डेरवण , परशुराम मंदिर , जयगड किल्ला
साभार:गूगल ब्लॉग.
संकलन:किरण भालेकर
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
-
Hey..., Trekkers & Nature Lovers .. Safar Sahyadri Trekkers organise a trek to Kalsubai_Highest Peak of Maharashtra on 23,24 Jun 2018...
-
लांजा तालुक्यात साटवली रोडला वसलेले माझ गोळवशी गांव .माझ्या या जन्मभूमिबद्दल थोडस काय आहे ना आज गावची आठवण येत आहे आणि मनाच्या कोपर्यात साठ...
-
Dear Trekkers And Hikers, Safar Sahyadri Trekkers organise a trek to fort Mahuli,Asangaon on 31,1(April) 2018 . ●Description● : Ma...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा