बुधवार, २ ऑगस्ट, २०१७

एका काळरातीची कथा

||  उष:काल होता होता काळरात्र झाली
   अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली ||

महाड दुर्घटनेला एक वर्ष पूर्ण झाले आणि आमच्या मनातील कटू आठवणी जाग्या झाल्या.तेव्हा ह्याच ढेरपोटया प्रकाश मेहतानी तिकडे जाऊन सेल्फी मारत होते.तिथे वाहून गेलेल्या नागरिकांच्या कुटूंबियाना सांत्वन करण्याऐवजी तुम्ही त्यांच्याशी उद्धट वर्तन केले.याचा आम्हा कोकणकरांच्या मनामध्ये प्रचंड राग होता.सत्तेची मस्ती चढलेला तुमच्यासारखा मुजोर नेता कोकणकरांनी पहिला.कुठे ते सेनेचे आमदार भरत गोगावले साहेब आणि कुठे तुम्ही ??? नेता व्हायची तुमची मुळात लायकीच न्हवती.पैशाच्या आणि भाजपच्या जीवावर तुम्ही उड्या मारत होतात.पण आता मुख्यमंत्री महोदयांनी प्रकरण आपल्या गळ्यापाशी आल्यावर स्वता बुडण्यापेक्षा तुम्हाला जेलची हवा खायला लावायचा घाट घातला हे कळण्याइतकी सामान्य जनता खुळी नाही.

    तुम्ही जेव्हा जेलमध्ये प्रवेश कराल तेव्हा सर्व कोकणकर तुमच्या नावाने शिमगा आणि होळी साजरी करतील यात शंका नाही.काळाचा महिमा अगाध आहे.या जन्मात जी पापे मनुष्य करतो ती याच जन्मात त्याला भोगावयास लागतात असे भगवद्गीतेमध्ये म्हटले आहे.याचे हे एक उत्तम उदाहरण ठरो अशी आमची सर्वांची मनीषा आहे.

3 ऑगस्ट 2016 चा तो दिवस आम्ही कसा विसरू? कोकणकरांच्या इतिहासाच्या कटू आठवणींमध्ये जोडला गेलेला हा एक दिवस. कोणाला स्वप्नातही वाटले नसेल कि असे काहीतरी घडू शकेल.परंतु काळ आणि क्रूर नियतीपुढे सर्व हतबल असतात.काहीही चूक नसताना पुरातील पाण्यात वाहून गेलेल्या मृतांच्या नातेवाईकानी कोणाच्या तोंडाकडे पहायचे  ??40 ते 50 जणांचे संसार एका रात्रीत पार चोळामोळा झाले याला जबाबदार कोण? मुंबई-गोवा महामार्गावर असलेले ब्रिटिशकालीन पूल संरक्षीत झाले का ?दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकाना प्रत्यक्षात मदत निधी मिळाला की नाही? व तो किती मिळाला ? अश्या अनेक प्रश्नांची उकल अद्यापही झालेली नाही.

एवढी मोठी दुर्घटना झाल्यानंतर अद्यापही सरकारला जाग आलेली नाही.पावसाळा चालू होऊन काही दिवस झाले नाहीत तोवर महामार्गाला खड्डे पडले आहेत. तो महामार्ग आहे की ग्रामसडक योजनेतून केलेला रस्ता ??15 ऑगस्ट पूर्वी खड्डे भरू असे कोणीतरी सत्ताधारी पक्षातील नेत्याने आश्वासन दिले म्हणजे पुन्हा एकदा चुना फासणार कोकणकरांना व परत पुढच्या वर्षी गणेशउत्सव आला की परत चुना फासणार हे वर्षांनुवर्षे तसेच चालत आले आहे.NH-17 म्हणजे मृत्यूचा सापळा ही ओळख बदलणार कधीच नाही.पूल एकवर्षात बांधू असे आश्वासन दिले होते ते नशीब पूर्ण केले.कारण तो मीडिया रेटींगचा आणि हायलाइट असलेला मुद्धा होता.असे महामार्गावर ब्रिटिशकालीन जीर्ण झालेले पूल आहेत तेसुद्धा नवीन बांधण्याची कर्तबगारी शासनाने दाखवावी.

 कोकणात जाताना या पुलाजवळ आल्यावर नकळत हात जोडले जातात.कोणाचा बाप,कोणाची आई,कोणाचा मुलगा तर कोणाचा भाऊ एका रात्रीने कायमचे हरवले होते आणि तेसुद्धा आपल्यापैकीच कोणाचे तरी नातेवाईक होते ही भावना अस्वस्थ करून जाते.महापुरात निधन झालेल्या सर्व कोकणकरांना भावपूर्ण श्रद्धांजली ....

                      किरण प्रकाश भालेकर
             Bhalekar117.blogspot.com
 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा